scorecardresearch

Video: “मैने ‘इस्लाम’ कबूल किया है”; राखी सावंतचा खुलासा

राखी सावंतने आदिलशी निकाह करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला असल्याची कबुली दिली आहे.

Video: “मैने ‘इस्लाम’ कबूल किया है”; राखी सावंतचा खुलासा
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेत्री राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीशी इस्लाम पद्धतीने लग्न केलंय. लग्नामुळे राखी सावंत सातत्याने चर्चेत आहे. तिने सात महिन्यांपूर्वी आदिलशी निकाह केला होता, पण तिने त्याबद्दल कुणालाही सांगितलं नव्हतं. आदिलने लग्नाबद्दल खुलासा करण्यास नकार दिला होता, असं कारण तिने दिलं होतं.

“मी माझ्या पतीला…” लव्ह-जिहाद संदर्भातील ‘त्या’ प्रश्नावर राखी सावंतचं स्पष्ट उत्तर


राखी सावंत उद्योगपती आदिल खान दुर्रानाला डेट करत होती. पण, काही महिने डेट केल्यानंतर त्यांनी लग्न केलं. दोघांनी इस्लाम पद्धतीने लग्न केलं. आदिलशी लग्न करण्यासाठी राखीने तिचं नाव बदललं, तसेच इस्लाम धर्मही स्वीकारला. तिच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांनी लग्न केल्याचं दिसतंय.

हिंदू, मुस्लीम अन् आता उर्फी जावेदने शीख धर्माबद्दल केलं ट्वीट; म्हणाली, “मी धार्मिक नाही पण…”

राखी सावंतने आदिलशी निकाह करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला असल्याची कबुली दिली आहे. “आदिलने मला कबुल केलंय, मी त्याला कबुल केलंय. आमच्या दरम्यान धर्म नाही. होय, आम्ही निकाह केला आहे आणि आदिलने माझं नाव फातिमा ठेवलंय. ते नाव आणि इस्लाम दोन्हीही मी कबुल केलंय. मी माझ्या पतीला मिळवण्यासाठी, माझं प्रेम मिळवण्यासाठी जे करू शकत होते, ते सर्व मी केलंय,” असं राखी म्हणाली. राखीने इस्लाम कबूल केल्याचं म्हटलंय.

आपण जात-पात मानत नाही, आपल्याला लव्ह-जिहाद म्हणजे काय हे माहीत नाही, असंही राखी व आदिल खान यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-01-2023 at 09:59 IST

संबंधित बातम्या