रक्षाबंधन हा देशात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधून हे नातं आणखी घट्ट करतात. भारतात असा एकही सण नसेल ज्याला बॉलिवूडमध्ये एखादं गाणं नाही. त्यात रक्षाबंधन हा सण म्हटल्यावर बॉलिवूडमध्ये तर या सणाची अनेक प्रसिद्ध गाणी ऐकायला मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात बॉलिवूडमध्ये अशी कोणती गाणी आहेत, ज्यामुळे या सणांचा उत्साह आणखी वाढतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१. मेरे भैया मेरे चंदा मेरे अनमोल रतन…
राम माहेश्वरी दिग्दर्शित काजल या चित्रपटातील हे सुप्रसिद्ध गाणं असून या गाण्यात भावा- बहिणीचं अनोखं नातं दाखवण्यात आलं आहे. मीना कुमारी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्याला आशा भोसले यांचा सुरेख आवाज लाभला आहे. साहिर लुधियान्वी यांनी हे गाणे लिहिले असून रवी यांनी त्याला संगीत दिले आहे. या गाण्यात मीना कुमारी आपल्या भावाला हे गाणं गाऊन त्याच्यासाठीचं प्रेम व्यक्त करते.

२. फुलों का तारों का सबका कहना है-
१९७१ मध्ये आलेला ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातलं हे गाणं असून आजही त्याची तितकीच लोकप्रियता पाहायला मिळते. देव आनंद आणि झीनत अमान यांच्यावर चित्रीत झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन देव आनंद यांनीच केले होते.

३. भैया मेरे राखी के बंधन को निभाना –
अभिनेते बलराज साहनी आणि नंदा यांच्यावर चित्रीत झालेले हे गाणे १९७१ मध्ये आलेल्या ‘छोटी बहन’ या चित्रपटातील आहे. हे गाणे रक्षाबंधन सणावरच चित्रीत करण्यात आले. यात नंदा आपल्या भावाला म्हणजे बलराज साहनी यांना राखी बांधताना हे गीत म्हणतात. शंकर जयकिशन यांनी या गाण्याला संगीत दिले असून शैलेंद्र यांनी हे गाणे लिहिले आहे. तर लता मंगेशकर यांनी हे गाणे गायले आहे.

वाचा :  Rakshabandhan 2019 : बॉलिवूडमधील बहीण- भावाच्या ‘या’ जोड्या माहितीयेत का?

४. बहना ने भाई की कलाई से प्यार बांधा है…
हे गाणं धर्मेंद्र यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. १९७४ साली आलेल्या रेशम की डोर या चित्रपटातील हे गाणं आहे. शंकर- जयकिशन यांचं संगीत लाभलेलं हे गाणं शैलेंद्र यांनी लिहीलं आहे. तर सुमन कल्याणपुर यांचा आवाज या गाण्याला लाभला आहे.

५. ये राखी बंधन है ऐसा –
१९७२ मध्ये आलेल्या ‘बेईमान’ या सिनेमातले रक्षाबंधनचे तेव्हाचे सुपरहिट गाणे होते. शंकर- जयकिशन यांचे संगीत असलेले हे हाणे लता मंगेशकर यांनीच गायले होते. मनोज कुमार, राखी, प्राण, स्नेह लता आणि प्रेमनाथ यांच्या मुख्य भूमिका होत्या.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan 2019 rakshabandhan special song ssj
First published on: 13-08-2019 at 18:15 IST