हातात कंडोमचे पॅकेट अन्…; रकुल प्रीत सिंहचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत

हा फोटो रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून चर्चेत आहे.

Rakul Preet Singh, Rakul Preet Singh Movie, Rakul Preet Singh Upcoming Movie, Rakul Preet Singh Chhatriwali, Chhatriwali Poster, Chhatriwali Movie Look,

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे रकुल प्रीत सिंह. रकुलने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता ती बॉलिवूडमध्ये सक्रिय असून तिचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याचे पाहायला मिळते. आता रकुलचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ती हातात कंडोम घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. रकुलने असा फोटो का शेअर केला आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रकुलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला हा फोटो तिच्या आगामी चित्रपटातील आहे. तिच्या या चित्रपटाचे नाव छत्रीवाली असे आहे आणि हा फोटो चित्रपटाचे पहिले पोस्टर आहे. हे पोस्टर थोडे हटके आहे. यामध्ये रकुलच्या हातात कंडोमचे पॅकेट दिसत आहे.
आणखी वाचा : ठरलं! या दिवशी प्रदर्शित होणार ‘झोंबिवली’

हा फोटो शेअर करत रकुलने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच हे पोस्टर पाहून चित्रपटात रकुल कोणत्या भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रकुलच्या या पोस्टवर कलाकरांसोबतच चाहत्यांनी देखील कमेंट केल्या आहेत.

‘छत्रीवाली’ या चित्रपटाचे लखनऊ येथे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात ती एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच तिचा ‘डॉक्टर जी’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आयुषमान खुराना मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rakul preet singh in upcoming movie chhatriwali poster film details with characters in the film avb

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या