लॉकडाउन असल्यामुळे सध्या घरात अडकलेल्या नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी दूरदर्शनने ९०च्या दशकातील मालिका पुन्हा सुरु केल्या आहेत. यामध्ये पहिल्या आठवड्यापासून रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका टीआरपीमध्ये वरच्या स्थानावर आहे. ही मालिका पुन्हा एकदा सुरु झाल्यामुळे यातील कलाकारही सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर भन्नाट मीम्स व्हायरल होत असल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे रामायणातील लक्ष्मण या भूमिकेवर सर्वाधिक मीम्स तयार करण्यात आले असून यावर लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

‘रामायण’ या मालिकेत सुनील लहरी यांनी लक्ष्मण ही भूमिका साकारली होती. ९० च्या दशकात गाजलेली ही मालिका पुन्हा सुरु झाल्यामुळे प्रेक्षकांसोबत मालिकेतील कलाकारही प्रचंड खूश आहे. विशेष म्हणजे तब्बल ३० वर्षांनंतर आमच्याकडे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष गेल्याची भावना सुनील लहरी यांनी व्यक्त केली आहे. तसंच व्हायरल होणारे मीम्सदेखील आवडत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

View this post on Instagram

 

जय हो

A post shared by Sunil Lahri Official Fanpage (@sunil_lahri_fanpage) on

“रामायण सुरु झाल्यानंतर अनेक मीम्स व्हायरल होत आहेत. माझ्या भूमिकेवरूनही अनेक मीम्स तयार झाले आहेत. माझ्या ओळखीचे अनेक जण मला हे मीम्स पाठवतायेत. इतकंच कशाला माझा पुतण्यादेखील मला असे नवनवीन मीम्स शेअर करत आहे. पण हे सारं पाहून मला मज्जा येतीये. मी हे सारं काही एन्जॉय करतोय. असं म्हटलं जातं की, जेव्हा तुम्ही लोकप्रिय होता तेव्हाच तुमच्यावर मीम्स तयार होता. त्यामुळे आता मला अभिमानास्पद वाटत आहे”, असं सुनील लहरी यांनी सांगितलं.

 

View this post on Instagram

 

Follow @memerbuddha . . . #ramayana #ramayanmemes #Memerbuddha #Viveksinghania026 #TEB #Carryminati #bblivines #likes4like #lockdownmemes #lakshman #lakshmanmemes

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

A post shared by MEME WALA BUDDHA (@memerbuddha) on

पुढे ते म्हणतात, “मी मीम्सचा एक भाग असल्यामुळे मला हे आवडतंय. तसंच जर पुन्हा या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली तर मी लक्ष्मणाचीच भूमिका करेन”. दरम्यान, दूरदर्शनवर पुन्हा प्रसारित झालेली ही मालिका पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे पहिल्या आठवड्यापासून ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल स्थानावर आहे. तसंच यातील कलाकारदेखील पुन्हा एकदा चर्चेत आले असून त्यांच्याविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे.