शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांचे वडील यशवंत पाध्ये यांनी भारतात शब्दभ्रमकला रुजविली. त्यांनी तयार केलेल्या ‘अर्धवटराव’ या बाहुल्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत. रामदास पाध्ये आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अर्धवटराव यांची शंभरी जगभर साजरी करण्याचे ठरविले आहे. त्या अंतर्गत ‘कॅरी ऑन रामदास पाध्ये लाइव्ह’  कार्यक्रमाचा शुभारंभ शनिवारी मुंबईत वरळी येथे नेहरू सेंटरच्या ‘नाटय़ महोत्सवा’त झाला. त्या निमित्ताने..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘शद्बभ्रम’ ही एक वेगळी कला असून ‘बोलक्या बाहुल्या’ स्वरूपात त्याचे सादरीकरण आपण पाहिलेले आहे. एकेकाळी या कलेला भारतात फारशी मान्यता किंवा प्रतिष्ठा नव्हती. आज आपल्या देशातही ‘शब्दभ्रम’ कलेला प्रतिष्ठा मिळाली आहे.  ‘बोलक्या बाहुल्या’ म्हटले की मराठी माणसाला पहिले नाव आठवते ते रामदास पाध्ये यांचे. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून काही वर्षांपूर्वी रामदास पाध्ये यांनी ‘अर्धवटराव’ आणि ‘आवडाबाई’ या बाहुल्यांना घेऊन सादर केलेले कार्यक्रम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. ‘लिज्जत पापड’च्या जाहिरातीमधील ‘कर्रम कुर्रम लिज्जत पापड’ हे वाक्य प्रेक्षकांच्या ओठावर आहे. महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ चित्रपटातील ‘तात्या विंचू’ हा बाहुलाही प्रेक्षक विसरलेले नाहीत. ‘बोलक्या बाहुल्यां’च्या या संसारात रमलेल्या रामदास पाध्ये यांना त्यांच्या पत्नी अपर्णा यांची साथ मिळाली. आता रामदास व अपर्णा आणि त्यांची दोन मुले सत्यजित व परीक्षित आणि सत्यजितची पत्नी व रामदास-अपर्णा यांची सून ऋतुजा हे सगळेच कुटुंबीय ‘बोलक्या बाहुल्या’मय झाले आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas padhye is an indian puppeteer celebrating century
First published on: 25-09-2016 at 02:31 IST