गेल्या अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी कतरिना कैफ लवकरच विवाहबद्ध होणार आहेत. खुद्द रणबीर कपूरने तशी माहिती दिली आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मी आणि कतरिना येत्या वर्षभरात लग्न करणार असल्याचे रणबीरने सांगितले. यंदाच्या वर्षात आम्हा दोघांचे वेळापत्रक खूपच व्यस्त होते. त्यामुळे लग्न करण्यासाठी वेळ मिळाला नाही. मात्र, येत्या वर्षभरात लग्न करण्याचा निर्णय आम्ही दोघांनी मिळून घेतल्याचे त्यांनी सांगितले.
आम्हाला आमच्या नात्याविषयी पुरेसा विश्वास आहे. मात्र, आता जर आम्ही अधिक वेळ घेतला तर, तो आमच्या नात्याचा अपमान ठरेल. मी आता ३३ वर्षाचा झालो आहे , ही संसाराला सुरूवात करण्याची योग्य वेळ आहे. कतरिनाचीदेखील तीच इच्छा आहे. मी चित्रपट क्षेत्राचे वातावरण असलेल्या कुटुंबात लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे मला इंडस्ट्रीत चालणाऱ्या चर्चांविषयी चांगलीच कल्पना आहे. मात्र, याबाबतीत माझे एक साधे तत्व आहे. जेव्हा तुमच्याबाबत चर्चा होते, तेव्हा लगेच व्यक्त होऊ नका आणि लोक तुमच्याबाबत काय चर्चा करतात याचा जास्त विचार करू नका, असे रणबीरने म्हटले.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2015 रोजी प्रकाशित
कतरिनाशी लग्न करण्याची हीच योग्य वेळ- रणबीर कपूर
गेल्या अनेक वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची प्रेयसी कतरिना कैफ लवकरच विवाहबद्ध होणार आहेत.

First published on: 10-05-2015 at 01:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor confirms his marriage plans with girlfriend katrina kaif