अभिनेता रणबीर कपूर आणि कतरिना कैफचे कथित प्रेमसंबंध नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहेत. गेल्या जवळजवळ सहा वर्षांपासून आपल्या लग्नाच्या विषयी ऐकत असून, आपण गुपचूप लग्न करणार नसल्याची खात्री रणबीरने माध्यमांना दिली. आपण प्रेमात असून, आपल्याला जबाबदारीची जाण असल्याचे सांगत त्याने इतक्यात लग्न करण्याचा विचार नसल्याचा खुलासा केला. आपल्या लग्नासंदर्भात येणाऱ्या बातम्या पाहून खूप मजेशीर वाटत असल्याचे देखील तो म्हणाला. माध्यमांना त्याने आपल्या लग्नाच्या तारखेविषयी अंदाज न बांधण्याची विनंती केली, तसेच माध्यमांपासून आपले लग्न लपवून ठेवणार नसल्याची ग्वाही दिली. अनुराग कश्यपच्या ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटात रणबीर कपूर दिसणार असून, १५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या चांगल्या कामगिरीविषयी त्याने आशा व्यक्त केली. या आधी प्रदर्शित झालेल्या ‘रॉय’ आणि ‘बेशरम’ या त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करता आली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor says i am in love but no wedding plans right now
First published on: 28-04-2015 at 07:40 IST