…तर आज आर. माधवन अभिनेता नसता

‘इस रात की सुबह नहीं’ हा माधवनचा पहिला चित्रपट आहे

मॅडी, मॅडी सर, मॅडी चेट्टा अशा विविध नावाने लोकप्रिय असलेला अभिनेता म्हणजे आर. माधवन. एकेकाळी लाखो तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपला दबदबा निर्माण करणाऱ्या या अभिनेत्याचा बॉलिवूडमध्येही मोठा चाहतावर्ग आहे. लोकप्रिय ठरलेल्या या अभिनेत्याला खरं तर अभिनय नव्हे तर देशसेवा करण्यात जास्त रस होता. त्यामुळे देशसेवेला वाहून घ्यावं ही त्याची मनापासून इच्छा होती.

माधवनचा जन्म १ जून १९७० रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे झाला. माधवनचं खरं नाव रंगनाथन माधवन असं असून रंगनाथन हे त्याच्या वडीलांचं नाव आहे. मात्र लोकप्रिय कलाकारांपैकी एक असलेल्या माधवनाला चाहत्यांनी विविध नावं दिली आहेत. त्यात ‘मॅडी’, ‘मॅडी भाई’, ‘मॅडी पाजी’, ‘मॅडी भाईजान’, ‘मॅडी सर’, ‘मॅडी चेट्टा’, ‘मॅडी अण्णा’ अशी अनेकविध नावाने चाहते त्याला संबोधत असतात. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या माधवनने त्याच्या करिअरची सुरुवात कोल्हापूरमध्ये एका शाळेत शिक्षक म्हणून केली होती. त्यानंतर त्याने मुंबईमधील के.सी. कॉलेजमधून पब्लिक स्पीकिंग या विषयात पदवी संपादन केली. शिक्षण पूर्ण करत असतानाच त्याने त्याचा पोर्टफोलिया करुन एका मॉडलिंग एजन्सीला दिला होता.

 

View this post on Instagram

 

Thank you for all the love Kolhapur.You will always be close to my heart.

A post shared by R. Madhavan (@actormaddy) on

१९९६ मध्ये माधवनने पहिल्यांदा एका चंदन पावडरच्या जाहिरातीमध्ये काम केलं. या जाहिरातीनंतर त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या ‘इरुवर’ या चित्रपटासाठी स्क्रीन टेस्ट दिली. मात्र यावेळी त्याच्या पदरात अपयश आलं. विशेष म्हणजे मणिरत्नम यांच्या चित्रपटासाठी नाकारण्यात आलेल्या माधवनने पुढील करिअरमध्ये मणिरत्नम यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘गुरू’.

‘इस रात की सुबह नहीं’ हा माधवनचा पहिला चित्रपट होतो. त्यानंतर त्याने २००१ मध्ये ‘मिनाले’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केलं. या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री रीमा सेनने त्याच्यासोबत स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर माधवनची लोकप्रियता झपाट्याने वाढली.

चित्रपटांमध्ये काम करण्यापूर्वी माधवनने अनेक मालिकांमध्येही काम केलं होतं. ‘बनेगी अपनी बात’ , ‘तोल मोल के बोल’ आणि ‘घर जमाई’ या सारख्या मालिकांमध्ये काम केलं. मात्र कलाविश्वामध्ये पदार्पण करणाऱ्या माधवनला या क्षेत्रात येण्याऐवजी लष्करात भरती व्हायचं होतं. त्या देशसेवा करायची होती. त्यामुळेच त्याने एक आर्मी ऑफिसर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र काही कारणास्तव त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही. परंतु कलाविश्वात त्याने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटविला.

दरम्यान, त्याच्या मिनाले या दाक्षिणात्य चित्रपटाचा ‘रहना है तेरे दिल में’ हा हिंदी रिमेक करण्यात आला. या चित्रपटामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत दिया मिर्जा, सैफ अली खान हेदेखील मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले होते. त्यानंतर त्याने ‘रंग दे बसंती’, ‘३ इडियट्स’,’ तनु वेड्स मनु’ आणि ‘तनु वेड्स मनु रिटर्न्स’ या चित्रपटामध्ये काम केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ranganathan madhavan birthday special career story ssj

ताज्या बातम्या