दिवाळीचे औचित्य साधून ‘रंगाई’ संस्थेच्या वतीने या दिवाळीचे वातावरण अधिक खुलवण्यासाठी मालिका आणि चित्रपटातील तरुण कलावंतांच्या भेटीचा ‘रंगात रंगली दिवाळी’ या कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६.३० वाजता ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात मधुरा वेलणकर, स्पृहा जोशी आणि चिन्मय मांडलेकर यांचे गमतीदार किस्से, गप्पांच्या आनंदाबरोबरच माधुरी करमरकर, वृषाली मळगी-पाटील, नचिकेत देसाई, श्रीरंग भावे यांच्या सुमधुर आवाजातील मैफल रसिकांना अनुभवता येणार आहे. उत्तरा मोने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून विराट सामाजिक व सांस्कृतिक मंच व नरेश म्हस्के यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हाच कार्यक्रम गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता कालिदास नाटय़गृह, मुलुंड, शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता रवींद्र नाटय़मंदिर प्रभादेवी तर शनिवारी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होणार आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rangat rangali diwali
First published on: 21-10-2014 at 06:37 IST