इंटरनेट सेंसेशन रानू मंडल २०१९मध्ये अतिशय लोकप्रिय ठरल्या होत्या. त्यांचे ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्या रोतारात स्टार झाल्या. बॉलिवूड गायक हिमेश रेशमियाने रानू मंडल यांना त्याच्या चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली. त्यानंतर रानू यांना मुंबईत फ्लॅट देण्याचे देखील वचन दिले होते. आता हिमेशने फ्लॅट देण्याचे वचन का दिले या मागचे कारण रानू यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे.

नुकताच रानू मंडल यांनी एका यूट्यूबरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी हिमेश रेशमियाने मुंबईत फ्लॅट घेऊन देण्याचे वचन दिल्याचे सांगितले. त्या मागील कारण देखील रानू यांनी सांगितले आहे.
Video: अखेर राखी सावंतचा पती आला सगळ्यांसमोर

यूट्यूबरने रानू मंडल यांना ‘मुंबईमध्ये तुमचे काय काय आहे?’ असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देत रानू मंडल म्हणाल्या की, ‘हिमेश यांनी मला सांगितले होते की फ्लॅट खरेदी करुन देईन. कारण ते जेव्हा मला मुंबईत बोलवायचे तेव्हा २ ते ३ दिवस मला तेथे थांबावे लागते. त्यानंतर परत इकडे यावे लागते. त्यामुळे त्यांनी मला मुंबईत प्लॅट घेऊन देण्याचे वचन दिले होते. जेणे करुन मला मुंबईत राहूनच शुटिंग वैगरे करता येईल. मुंबईत राहाणे, तेथील जेवण मला प्रचंड आवडते.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रानू मंडल यांचा रेल्वे स्थानकांमध्ये गाणे गाण्यापासून ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका हा जीवनप्रवास अतिशय खडतर होता. त्यांचा हा जीवनप्रवास ऐकून प्रेरीत झालेल्या चित्रपट निर्माता ऋषिकेश मंडलनेने रानू यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.