Padmavati new poster: अल्लाउद्दीन खिल्जीचा राजेशाही थाट

त्याच्या नजरेतील सूडाग्नी स्पष्टपणे पाहायला मिळते.

ranveer singh
रणवीर सिंग

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटात अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगला ट्रेलरमध्ये पाहून अंगावर येतो. डोळ्यांतून आग ओकणाऱ्या अल्लाउद्दीन खिल्जीची पुरेपूर झलक त्यात पाहायला मिळाली होती. ट्रेलरमध्ये त्याचा एकही संवाद नसतानाही त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर आता चित्रपटाचे आणखी एक पोस्टर प्रदर्शित झाले आहे, ज्यामध्ये सिंहासनावर बसलेला अल्लाउद्दीनच्या भुमिकेत रणवीरचा हा लूक अत्यंत लक्षवेधी आहे.

ट्रेलरप्रमाणेच या पोस्टरमध्येही त्याच्या नजरेतील सूडाग्नी स्पष्टपणे पाहायला मिळते. रणवीरने त्याच्या करिअरमधील सर्वांत दमदार भूमिका या चित्रपटात साकारली, असं म्हणायला हरकत नाही. राजेशाही थाट आणि क्रूरता याची चिन्हं रणवीरच्या या लूकमध्ये पाहायला मिळत आहेत. रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा पोस्टर शेअर केला.

PHOTO : ‘राझी’मध्ये आलियाचा काश्मिरी अंदाज

‘रामलीला’मधील राम असो किंवा ‘बाजीराव मस्तानी’मधील पेशवा बाजीराव, रणवीर प्रत्येक भूमिका जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्या भूमिकेला पडद्यावर तितक्याच जिवंतपणे साकारण्याचा प्रयत्न तो करतो. रणवीरसोबतच यामध्ये दीपिका पदुकोण राणी पद्मिनी तर शाहिद कपूर महारावल रतन सिंहची भूमिका साकारत आहे. हा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपट १ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ranveer singh makes alauddin khilji looks even more dangerous in the new poster of the film

ताज्या बातम्या