संपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या करोना विषाणूचा प्रसार सर्वप्रथम चीनमधून झाला होता. चीनमधील खाद्यसंस्कृतीमुळेच करोनासारख्या प्राणघातक विषाणूची निर्मिती झाली, असा दावा काही तज्ज्ञांनी केला होता. दरम्यान अभिनेत्री रविना टंडन हिने चिनी लोकांच्या खाद्य संस्कृतीवर जोरदार टीका केली आहे.

करोना व्हायरसच्या प्रकोपामुळे चीमधील खाद्य बाजार पूर्ण बंद झाले होते. मात्र या विषाणूचा प्रभाव कमी होताच त्यांच्या बाजारांमध्ये कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ यांसारख्या प्राण्यांचे मांस पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. किंबहूना चिनी लोकांनी हे प्राणी खाण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. यावरुन अभिनेत्री रविना डंटन हिने संताप व्यक्त केला आहे. “जंगली प्राण्यांचे सर्वाधिक शोषण चीनमध्येच केले जाते. चीन हा प्राण्यांसाठी सर्वात असुरक्षित देश आहे.” अशा आशयाचे ट्विट करुन रविनाने आपला संताप व्यक्त केला आहे.

संपूर्ण देशातील लोक सध्या करोना विषाणूमुळे त्रस्त आहेत. लोकांचे जनजीवन पार विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर रविनाचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.