कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांच्यामध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढ्यात अभिनेत्री रवीना टंडन हिने कंगनाला पाठिंबा दिल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्यानंतर रवीनाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हृतिक-कंगनाच्या वादात मी कोणा एकाची बाजू घेत नसून, माझी भूमिका न्यायाधीशाची असल्याचे रवीनाने म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वी रवीनाने एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी ब्लॉग लिहीला होता. प्रत्येकाला असलेल्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य या ब्लॉगमध्ये करण्यात आले होते. याशिवाय, कंगना-हृतिकमधी वादालाही स्पर्श करण्यात आला होता. मात्र, अनेक वेब पोर्टल्सनी रवीनाने ब्लॉगमधून कंगनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. रवीनाला याबाबतीत विचारण्यात आले. त्यावेळी तिने कंगनाला पाठिंबा दिल्याचे वृत्त पूर्णपणे फेटाळून लावले. रविनाने ट्विट केले की, एका मुलीला किंवा मुलाला पाठिंबा देण्याचा हा विषय अजिबात नाही. जे कोणी माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यांनी ब्लॉगमधील माझे मत नीट समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कोण चूकीचे आणि कोण बरोबर याचा मी न्यायनिवाडा केलेला नाही. मी फक्त एखाद्या व्यक्तीला न्याय मिळविण्यासाठी असलेल्या घटनात्मक अधिकारांवर भाष्य केले आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raveena tandon not taking sides in hrithik roshan kangana ranaut spat
First published on: 08-06-2016 at 16:01 IST