‘आई’ म्हटलं की प्रेम, माया आणि मुलांच्या चुका पदरात घेणारी वात्सल्याची मूर्तीच आपल्या डोळ्यांमसमोर उभी राहते. पण, या सर्व मुद्द्यांना काहीसं दूर सारत बॉलिवूडमध्ये काही अभिनेत्रींनी आईची नव्याने ओळख करुन दिली. ‘मदर इंडिया’तील नर्गिसपासून ते ‘वास्तव’मधील रिमाताईंपर्यंत वेळ पडल्यास आपल्या मुलांवरही बंदूक रोखणारी धीट आईसुद्धा बॉलिवूडने प्रेक्षकांसमोर आणली. ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांच्या निधनामुळे त्यांच्या कारकिर्दीविषयीच्या चर्चा होत असतानाच ‘वास्तव’ मधील त्यांची भूमिका विसरुन कसं चालेल?

रिमाताईंच्या चित्रपटांपासून ते त्यांच्या उल्लेखनीय भूमिकांच्या आठवणींपर्यंत सर्व काही अनेकांच्याच डोळ्यापुढे उभं राहिलं आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वास्तव’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली आईची भूमिकां विशेष गाजली. या चित्रपटात संजय दत्तच्या आईच्या भूमिकेत झळकललेल्या रिमा ताईंनी ज्या ताकदीने त्या पात्राला न्याय दिला होता त्याची प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. या भूमिकेसाठी त्यांना बऱ्याच पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं.

वाचा: ‘कितीतरी वेळ मी त्या १०० रूपयांकडे बघत बसले’

मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा गुन्हेगारी विश्वात कसा अडकत जातो आणि त्याची आईच कशा प्रकारे त्याच्याच डोक्यावर बंदूक रोखून त्याचा खात्मा करते याचं चित्रण ‘वास्तव’मध्ये करण्यात आलं होतं. ‘वास्तव’मधील आणखी एक दृश्य अनेकांच्याच स्मरणात आहे ते म्हणजे ‘पच्चास तोला…पच्चास तोला क्या पचास तोला’. दिवाळीच्या दिवशी संजय दत्त म्हणजेच ‘रघुभाई’ गळ्यात सोन्याची चैन घालून येतो तेव्हा घरातल्यांसाठी आणलेल्या भेटवस्तू देताना तो आपल्या आईसमोर बसतो आणि तिला साडी भेट देतो. तेव्हाच या चित्रपटातील लक्षवेधी संवादही त्या दृश्याला संस्मरणीय करुन जातो तेच हे दृश्य…

वाचा: Reema Lagoo : रिमाचं असं निघून जाणं अत्यंत दु:खदायक – आलोकनाथ