बॉलीवूडमधील मि. परफेक्शनिस्ट आमिर खानचा चित्रपटागणिक बदलणारा लूक नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित ‘पीके’मध्ये एलियनची हटके भूमिका साकारल्यानंतर आमिर पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या लुकमध्ये दिसणार आहे. आगामी ‘दंगल’ या चित्रपटासाठी आमिरने मध्यमवयीन पित्याची भूमिका साकारली आहे. आमिर चित्रपटात एका कुस्तीपटूची भूमिका साकारणार आहे. ‘दंगल’ हा चित्रपट भारतीय कुस्तीक्षेत्रात महिलांच्या प्रवेशाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या गीता आणि बबिता या दोघींचे वडील महावीर फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे. यापूर्वी प्रेक्षकांनी आमिरला कधीही अशाप्रकारची व्यक्तिरेखा साकारताना पाहिलेले नाही. डोक्यावरचे बारीक केलेले केस आणि पिकलेली दाढी अशा लुकमध्ये आमिरला पाहिल्यानंतर प्रेक्षकांना नक्कीच आश्चर्यचा धक्का बसेल. सध्या आमिर या चित्रपटातील भूमिकेला साजेशी शरिरयष्टी बनवण्यात व्यस्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revealed aamir khan turns old and grey for dangal
First published on: 30-01-2015 at 03:13 IST