‘पीके’ चित्रपटाच्या नावाचे गूढ उलघडले

आमीर खानचा अभिनय असलेला दिग्दर्शक राजकुमार हिराणींचा ‘पीके’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे प्रोमो आणि पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी…

आमीर खानचा अभिनय असलेला दिग्दर्शक राजकुमार हिराणींचा ‘पीके’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे प्रोमो आणि पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाविषयी कमालीचे औत्सुक्य निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ‘पीके’ या नावानेदेखील त्यांच्या मनात कुतूहल निर्माण केले आहे. ‘पीके’ नावामागचे गौडबंगाल हा व्हिडिओ पाहिल्यावर उलगडते. चित्रपटात ‘पीके’ची भूमिका साकारणारा आमीर खान जगत जननी म्हणजेच अनुष्का शर्माला आपले नाव ‘पीके’ का पडले याचा खुलासा करताना व्हिडिओमध्ये दिसतो. त्यानंतर जे काही समोर येते ते खूप विनोदी आहे. व्हिडिओमधील हा भाग शब्दात मांडण्यापेक्षा तो पाहाण्यात जास्त मजा आहे. चित्रपटाचा हा पहिलाच ‘डायलॉग प्रोमो’ आहे. ‘पीके’ नावामागचे गूढ जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पाहा.

‘पीके’ चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असून, या प्रोमोने त्यात निश्चितच भर पडणार आहे. आमीर खान, अनुष्का शर्मा, संजय दत्त आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या भूमिका असलेला ‘पीके’ चित्रपट १९ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Revealed why rajkumar hirani aamir khans new movies name is pk

ताज्या बातम्या