अभिनयात करिअर करायचंय? तर मग ऋषी कपूर यांचा ‘हा’ सल्ला ऐका

काय म्हणाले ऋषी कपूर?

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर आपल्या रोखठोक मतांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. परंतु यावेळी ते कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नव्हे तर अभिनय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन कलाकारांना दिलेल्या एका सल्ल्यामुळे चर्चेत आहेत.

ऋषी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत “डोले रहने से कोई अभिनेता नहीं बनता” असे म्हटले. तुम्ही नवीन कलाकारांना अभिनयाच्या बाबतीत कोणता सल्ला देऊ इच्छिता या प्रश्नावर त्यांनी असे उत्तर दिले.

“फक्त पिळदार शरीराच्या जोरावर कोणी अभिनेता होत नाही. एक उत्तम अभिनेता होण्यासाठी आधी अभिनय कसा करतात? हे शिकावे लागते. त्याचा सातत्याने सराव करावा लागतो. परंतु आताचे बहुतांश कलाकार केवळ पिळदार शरीर कमावण्यासाठी मोठमोठ्या जिममध्ये मेहनत करताना दिसतात. जर त्यांनी जिममधील थोडा वेळ आपल्या अभिनयासाठी जर खर्च केला, तर ते इतिहास घडवू शकतील. त्यांचे नाव देशातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम कलाकारांमध्ये घेतले जाईल. परंतु त्यासाठी त्यांनी आपले लक्ष बॉडिबिल्डिंगच्या दिशेने नव्हे तर अभनयाच्या दिशेने केंद्रित करणे गरजेचे आहे.” असा सल्ला नवीन कलाकारांना ऋषी कपूर यांना दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rishi kapoor to newcomers dole rahne se kalakar nahi banoge mppg

Next Story
चित्ररंग : फक्त जिस्मदर्शन
ताज्या बातम्या