बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांनी त्यांच्या दुसऱया बाळाचे बारसे केले आहे. आपल्या चिमुकल्याचे नाव राहिल (rahyl) ठेवल्याचे रितेशने आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले. गुलाबी रंगात मोठ्या अक्षरात कोरलेले ‘राहिल’ नावाचे छायाचित्र रितेशने ट्विट केले आहे. देशमुख कुटुंबाताली सर्वात लहान चिमुकला राहिल, असा मथळा रितेने ट्विटमध्ये नमूद केला आहे. रितेशचे हे ट्विट जेनेलियानेही रिट्विट करून आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचविले आहे.
रितेश आणि जेनेलिया यांच्या प्रेमकहाणीला २००३ साली सुरूवात झाली होती, तर २०१२ साली दोघं विवाहबंधनात अडकले. २०१४ साली जेनेलियाने आपला पहिला मुलगा रिआनला जन्म दिला. त्यानंतर याच महिन्याच्या सुरूवातीला देशमुख कुटुंबात रिआनच्या लहान भावाचे आगमन झाले.
RAHYL – The Youngest Deshmukh pic.twitter.com/7Po1PRFMRU
— Riteish Deshmukh (@Riteishd) June 12, 2016
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.