बॉलीवूड व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळविल्यानंतर रितेश देशमुख आता छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. स्वत: रितेश देशमुखनेच ट्विटरवरून आपल्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
‘विकता का उत्तर’ या मराठी ‘क्विज शो’चे सूत्रसंचालन रितेश करणार आहे. रितेशचा मराठीतला छोट्या पडद्यावरचा हा पहिलाच शो असणार आहे. स्टार प्रवाहनेही या वृत्ताला दुजोरा देणार ट्विट केले आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरून हा शो प्रसारीत केला जाणार आहे. माझा मराठीमधला पहिला शो होस्ट करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे, असे रितेशने ट्विटमध्ये म्हटलेयं. या शोची जाहिरात नुकतीचं प्रसिद्ध करण्यात आली.