दिग्दर्शक रोहित शेट्टीचे चित्रपट म्हणजे त्याच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा डबल डोस असतो. अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स सारं काही एकत्र त्याच्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळतं. त्याचा शेवटचा ‘सुर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता रोहितने त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या बिग बजेट चित्रपटामध्ये हिंदीसह मराठी अभिनेत्यांच्या नावाचीही वर्णी लागली आहे. रोहितचा हा नवा प्रोजेक्ट म्हणजे मल्टिस्टारर चित्रपट असणार आहे.

रोहितने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ‘सर्कस’ (Cirkus) या त्याच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. “प्रेक्षकांना पुन्हा एकदा चित्रपटगृहामध्ये आणण्याची हिच ती वेळ आहे. ‘सर्कस’ चित्रपट म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ख्रिसमस गिफ्ट आहे. कारण या सर्कसमध्ये खूप गोलमाल आहे.” असं रोहितने या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना म्हटलं आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या चित्रपटामध्ये देखील मनोरंजनाचा डबल डोस प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

Karsandas Mulji journalist praised by Modi Netflix Maharaj film controversy
आमिर खानच्या मुलाने साकारलेले करसनदास मुलजी तेव्हाही आणि आताही वादात; चित्रपटावर बंदीची मागणी का होत आहे?
Marathi Film Festival during July 2728 in California
कॅलिफोर्नियामध्ये २७२८ जुलै दरम्यान मराठी चित्रपट महोत्सव
hamare barah movie annu kapoor
‘दंगल भडकेल’; कर्नाटकमध्ये ‘हमारे बारह’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर काँग्रेस सरकारची बंदी
aishwarya narkar favorite actor arun sarnaik (1)
ऐश्वर्या नारकर ७० च्या दशकातील ‘या’ मराठी अभिनेत्याच्या आहेत चाहत्या, आवडता चित्रपट अन् गाणं जाणून घ्या…
Cannes International Film Festival All We Imagine As Light movie
आनंददायी कानपर्व
Allu Arjun, Rashmika Mandanna starr Pushpa 2 second song Angaaron Out
Video: ‘पुष्पा २’ चित्रपटामधील श्रेया घोषालच्या आवाजातील दुसरं गाणं प्रदर्शित, अल्लू अर्जुन व रश्मिका मंदानाच्या हूक स्टेपने वेधलं लक्ष
“…असं मुस्लीम कुटुंब दाखवा अन् ११ लाख जिंका”, ‘त्या’ हिंदी चित्रपटावरील वादानंतर जितेंद्र आव्हाडांची घोषणा
kan award
पायल कपाडियाची ऐतिहासिक कामगिरी; ‘कान’मध्ये ‘ऑल वी इमॅजिन ॲज लाईट’ला ‘ग्रां प्री’ पुरस्कार

आणखी वाचा – १०० दिवसांनी रुग्णालयातून घरी परतली लेक, प्रियांका चोप्रा मात्र शूटिंगमध्ये झाली व्यस्त, पाहा फोटो

चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये कलाकार विविध भूमिकेमध्ये दिसत आहेत. तसेच रणवीर सिंगचा यामध्ये डबर रोल असल्याचं दिसत आहे. एक भूमिका अगदी साधी तर दुसरी भूमिका एकदम बिनधास्त असल्याचं दिसून येतंय. तसेच अभिनेता वरुण शर्मा देखील या चित्रपटामध्ये डबल रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. पोस्टरमध्ये इतर कलाकार रेट्रो लूकमध्ये दिसत आहेत. या चित्रपटामध्ये हिंदीमधील टॉपच्या अभिनेत्री देखील काम करताना दिसणार आहेत.

आणखी वाचा – सैफ-करीनाचा लाडका तैमूर घेतोय तायक्वांदोचं प्रशिक्षण, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

जॅकलिन फर्नांडिस, पुजा हेगडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत काम करताना दिसतील. त्याचबरोबरीने सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले या मराठी कलाकारांच्या ही या चित्रपटामध्ये महत्त्वाच्या भूमिका आहेत. सोशल मीडियावर या चित्रपटाच्या पोस्टरला चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. चित्रपट येत्या २३ डिसेंबरला म्हणजे ऐन ख्रिसमसच्या मोक्यावर बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.