भारतीय चित्रपटांचे चाहते आज संपूर्ण जगभरात देशभरात पसरले आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप यांप्रमाणेच जपान, चीन यांसारख्या देशातही भारतीय चित्रपट आवडीने पाहिले जातात. एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतीयांना वेड लावलेच पण त्यानंतर या चित्रपटाने परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ घातली आहे.

आणखी वाचा : शाहरुख आणि सलमानच्या आगामी चित्रपटांना मागे टाकत अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ने रचला नवा विक्रम

marathi actor Makarand Anaspure appeared in the look of CM Eknath Shinde in the movie Juna Furniture
‘जुनं फर्निचर’ चित्रपटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लूकमध्ये झळकले ‘हे’ प्रसिद्ध अभिनेते, पाहा फोटो
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
vfx oscar winner tim mcgovern
व्यक्तिवेध : टिम मॅकगव्हर्न

एसएस राजामौली, राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांचा समावेश असलेली ‘आरआरआर’ची टीम सध्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जपानमध्ये आहे. या दोन्ही स्टार्सचे जपानमध्ये जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शुक्रवारी जपानच्या चित्रपटगृहात ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने प्रभासच्या ‘साहो’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. याचे कारण म्हणजे, ‘आरआरआर’ हा जपानमध्ये पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे.

एका अहवालानुसार, या चित्रपटाने १८ दशलक्ष येन कमावले आहेत. याची भारतीय किंमत १.०६ कोटी रुपये आहे. याआधी हा विक्रम प्रभासच्या ‘साहो’च्या नावावर होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ९० लाखांची कमाई केली होती. या वीकेंडपर्यंत हा चित्रपट जपानी बॉक्स ऑफिसवर ३.५ कोटी रुपयांचा व्यवसाय करेल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा : ऑस्करच्या शर्यतीत ‘RRR’ मागे पडल्याने हॉलिवूडचे दिग्दर्शक संतापले, म्हणाले, ‘ही शुद्ध

‘आरआरआर’ चित्रपट जपानी प्रेक्षकांना प्रचंड आवडलेला दिसत आहे. ट्विटरवर जपानमधील प्रेक्षक प्रतिक्रिया देत या चित्रपटाचे खूप कौतुक करत आहेत. एकाने लिहिले, “‘आरआरआर’ हा वर्षातील सर्वोत्तम चित्रपट आहे…नक्की पहा!” तर दुसऱ्याने लिहिले, “या चित्रपटाची कथा, कथेची मांडणी, संवाद, नातू गाणे हे सगळेच उत्कृष्ट आहे.”