नवरात्र म्हणजे नऊ दिवस चालणारा सृजनाचा उत्सव. गणपती उत्सव संपला म्हणजे वेध लागतात नवरात्रीचे. जागोजागी देवीच्या पूजेसाठी, स्थापनेसाठी मंडप उभारले जातात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी, अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते. घटस्थापनेच्या दिवशी अभिनेत्री रुपाली भोसले हिने दुर्गावतारातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग राखाडी असल्याने रुपालीने राखाडी रंगाची साडी परिधान केली आहे. दुर्गा देवीची शक्ती ही प्रत्येक महिलेत असते असं कॅप्शन देत तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.

येडेश्वरी देवी चरणी लाखो भाविकांचा जनसागर
jotiba yatra kolhapur 2024 marathi news
जोतिबाचा डोंगर तीन लाख भाविकांनी फुलला; मंगळवारी मुख्य यात्रा
Welcome New Year with Padwa Yatra in Akola
अकोला : पाडवा यात्रेतून नववर्षाचे चैतन्यमय स्वागत; मतदानाबाबत जनजागृती, पारंपरिक वेशभूषेत तरूणाई
sangeet natak akademi kolhapur marathi news
संगीत नाटक अकादमीच्या वतीने अंबाबाई मंदिरात बुधवार, गुरुवारी ‘शक्ती महोत्सवा’चे आयोजन

https://www.instagram.com/p/CGbtKMQj6BO/

देवीने नवरात्राचे नऊ दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे तिचे नाव रूढ झाले. या तिच्या शक्तिरूपाचीच पूजा नवरात्रीत केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्तीच नवरात्रीत पूजिली जाते. ‘या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, नमस्तस्ये, नमस्तस्ये नमो नम:’ असेच म्हटले जाते. एरवी, ‘सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते’ अशी तिची प्रार्थना केली जाते.