मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, त्यास चाहत्यांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. सचिनने आपल्या ट्विटर हॅण्डलवर टीझर प्रदर्शित केला.
विशेष म्हणजे, चित्रपटात सचिन तेंडुलकरच स्वत:ची व्यक्तीरेखा साकारणार आहे. ‘२०० नॉट आऊट’ या प्रोडक्शन कंपनीने हा चित्रपट तयार केला असून सुप्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स अर्सकाईन यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. टीझरमध्ये खुद्द सचिन स्वत:च्या आवाजात त्याच्या बालपणी त्याच्या वडिलांनी अर्थात रमेश तेंडुलकर यांनी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश सांगताना दिसतो, तर स्टेडियमवर क्रिकेट चाहत्यांचा सचिन सचिन..नावाचा जयघोष मैदानातील त्याच्या जुन्या आठवणी ताज्या करणारा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाहा सचिनच्या चित्रपटाचा टीझर-

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin a billion dreams official teaser sachin tendulkar
First published on: 14-04-2016 at 13:47 IST