‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, अलीकडेच झळकलेला ‘पितृऋण’ तसेच हिंदीच्या रूपेरी पडद्यावर गाजलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा असो की सध्या गाजत असलेल्या ‘कोण होईल मराठी करोडपती’ रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन असो, आपला भारदस्त आवाज आणि तितकाच दमदार व संवेदनशील अभिनय याची अमीट छाप उमटविणारा अभिनेता सचिन खेडेकर या शनिवार, १ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘पार्ले कट्टा’ उपक्रमात येऊन रसिकांशी मनमोकळा संवाद साधणार आहे. त्यांच्याशी रसिकांच्या वतीने चित्रा वाघ संवाद साधतील.
‘पार्ले कट्टा’ उपक्रमातील मुक्त व्यासपीठअंतर्गत अॅड. किशोर जावळे ‘लॉर्ड मेकॉले शिक्षणपद्धती समज-गैरसमज’ या विषयावर प्रतिपादन करतील.
साठय़े उद्यान, मालवीय पार्क रस्ता चौक, शिवसेना शाखेसमोर, विलेपार्ले पूर्व या नेहमीच्या ठिकाणीच पार्ले कट्टा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. संपर्क – रत्नप्रभा महाजन (९९३०४४८०८०).
संग्रहित लेख, दिनांक 1st Mar 2014 रोजी प्रकाशित
‘पार्ले कट्टा’मध्ये अभिनेता सचिन खेडेकर
‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, अलीकडेच झळकलेला ‘पितृऋण’ तसेच हिंदीच्या रूपेरी पडद्यावर गाजलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा असो की सध्या गाजत असलेल्या ‘कोण होईल मराठी

First published on: 01-03-2014 at 01:04 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin khedekar in parle katta