scorecardresearch

सचिनवरील चित्रपटात अर्जुन तेंडलुकर नाही

सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या चित्रपटात बालपणीच्या सचिनची भूमिका साकारत असल्याची चर्चा रंगली.

सचिनवरील चित्रपटात अर्जुन तेंडलुकर नाही
अर्जुन तेंडुलकरची या चित्रपटात कोणतीही भूमिका नसल्याचे, सुत्रांनी सांगितले.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या जीवनावर आधारीत ‘सचिन अ बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकर या चित्रपटात बालपणीच्या सचिनची भूमिका साकारत असल्याची चर्चा रंगली. पण चित्रपटाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिनवरील चित्रपटात अर्जुन तेंडुलकर काम करत असल्याची चर्चा केवल अफवा असल्याचे समोर आले आहे. अर्जुन तेंडुलकरची या चित्रपटात कोणतीही भूमिका नसल्याचे, सुत्रांनी सांगितले.

VIDEO: सचिन तेंडुलकरच्या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

दिग्दर्शक जेम्स अर्सकाईन यांनी दिग्दर्शित केलेला ‘सचिन अ बिलिअन ड्रीम्स’ हा चित्रपटाच्या वर्षाअखेरीस चित्रपटगृहात दाखल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-04-2016 at 22:12 IST