कारकीर्दीच्या सुरुवातीला तिला ‘पवित्र रिश्ता’ या मालिके ने हात दिला. एकता कपूरची निर्मिती असलेली ही मालिका २००९ मध्ये प्रदर्शित झाली होती. सलग सहा वर्षे चालल्यानंतर ही मालिका बंद झाली. या मालिके ने अंकिता लोखंडेला अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. सुशांत सिंह राजपूतसारखा जोडीदार मिळवून दिला. आज २०२१ मध्ये पुन्हा एकदा हीच मालिका नव्या माध्यमात, नव्या स्वरूपात लोकांसमोर आली आहे. आठ वर्षांनंतर ‘पवित्र रिश्ता २.०’मधून पुन्हा अर्चना म्हणून लोकांसमोर येताना वास्तवात अनेक गोष्टी बदललेल्या आहेत, असं ती म्हणते. ‘पवित्र रिश्ता’तून लोकप्रिय झालेली अर्चना – मानव ही काल्पनिक जोडी मात्र बदललेली नाही. ती लोकांच्याही मनात तशीच आहे, असं ती सांगते.

‘पवित्र रिश्ता’ ही मालिका अल्ट बालाजीवर ‘पवित्र रिश्ता २.०’ नावाने वेबमालिके च्या स्वरूपात लोकांसमोर आली आहे. इतक्या वर्षांनंतर अर्चनाची मुख्य भूमिका मला साकारायला मिळणं ही माझ्यासाठी सुवर्णसंधीच होती, असं अंकिता सांगते. ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका जेवढी वर्ष सुरू होती तेवढी वर्ष अर्चना हीच अंकिताची ओळख बनून राहिली होती. या मालिके नंतर ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ आणि  ‘बागी ३’ सारख्या चित्रपटांतून तिने काम के ले. ‘पवित्र रिश्ता’ संपल्यानंतर मध्ये बराच काळ गेला आहे, पण अर्चना नव्याने सापडणं कठीण गेलं नाही. कारण ती इतकी वर्षे आपल्यात भिनलेली आहे, असं अंकिता सांगते. दूरचित्रवाहिनीवर गाजलेली मालिका ओटीटीसारख्या नव्या माध्यमात वेबमालिके च्या स्वरूपात येताना मूळ कथा बदललेली नसली तरी त्यात काळानुसार काही बदल करावे लागले आहेत, असं ती म्हणते. आत्ताच्या अर्चनात आत्मविश्वास अधिक आहे. ती नोकरी करते आहे. पण तिचा आणि मानवचा मूळ स्वभाव, त्यांच्या व्यक्तिरेखेत फारसा बदल झालेला नाही. अर्चनाच्या बहिणी, मानवची आई या व्यक्तिरेखा तशाच आहेत, कलाकार मात्र जवळपास सगळेच बदलले आहेत, अशी माहिती तिने दिली.

Raja Ranichi Ga Jodi fame actor Sanket Khedkar new serial Jai Jai ShaniDev coming soon
Video: ‘राजा राणीची गं जोडी’ फेम अभिनेत्याची येतेय नवी मालिका; शनिदेवावर आहे आधारित, पाहा जबरदस्त प्रोमो
Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
tigress archi video marathi news, loksatta tiger video marathi news
VIDEO: आर्चीच्या बछड्यांची ‘मस्ती की पाठशाला’, टिपेश्वरच्या जंगलातील दंगामस्ती कॅमेऱ्यात कैद
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

मानवच्या भूमिके साठी शाहीरची कसून तयारी

अभिनेता शाहीर शेख सध्या मानवची भूमिका करतो आहे. आपल्यापेक्षा शाहीरला मानवची भूमिका करणं कठीण होतं याची तिला कल्पना आहे. मानवची भूमिका करत असताना शाहीरची तुलना थेट सुशांतशी होणार हे त्यालाही माहीत असल्यानेच त्यालाही दडपण आलं होतं. मात्र त्याने या भूमिके साठी प्रचंड मेहनत घेतली असून त्याने मानवची भूमिका कमाल के ली आहे, अशा शब्दांत ती आपल्या सहकलाकाराचं कौतुक करते.

सुशांतशिवाय…

२००९ मध्ये तिने आणि सुशांतने या मालिके पासून आपल्या कारकिर्दीची खऱ्या अर्थाने सुरुवात के ली होती. वर्षभरानंतर याच मालिके च्या सेटवर एक मेकांच्या आकं ठ प्रेमात बुडालेली ही जोडी २०१६ मध्ये वेगळी झाली. त्यांच्यातले प्रेमाचे नाते पुढे सरकले नसले तरी त्यांच्यातली मैत्री कायम होती. त्यामुळे पुन्हा एकदा ‘पवित्र रिश्ता’ची सुरुवात करत असताना त्याची आठवण येणार नाही हे शक्यच नाही. त्याच्या आठवणींशिवाय माझं आयुष्यच पूर्ण होऊ शकत नाही. त्या कायम माझ्याबरोबर असणार, मात्र वैयक्तिक आयुष्यात आणि व्यावसायिक आयुष्यातही कटू आठवणी मागे सारून पुढे जात राहणं महत्त्वाचं असल्याचं ती सांगते.

उषाआईशी कायम संपर्कात

अर्चना आणि मानवबरोबर या मालिके त आणखी एक व्यक्तिरेखा कायम महत्त्वाची राहिली आहे ती म्हणजे मानवची आई सविता देशमुख. अर्चनाच्या या खाष्ट सासूची भूमिका अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी साकारली होती. उषा नाडकर्णींची खाष्ट तरी प्रेमळ सासू लोकांना भलतीच आवडली होती. नव्या पर्वातही त्याच ही भूमिका साकारत आहेत. अर्चना आणि आई या जोडीला तोड नाही, असं अंकिता सांगते. मी प्रत्यक्षातही उषा आईशी जोडली गेले आहे. त्यामुळे  मालिका संपल्यानंतरही आम्ही कायम संपर्कात असायचो. तिच्यासारखी उत्तम अभिनेत्री नाही, त्यामुळे पुन्हा ‘पवित्र रिश्ता २.०’च्या सेटवर तिच्याबरोबर एकत्र येणं हा खरा आनंद आहे, असं ती म्हणते.

ओटीटी उपयुक्त माध्यम

ओटीटीवर प्रत्येक जण आपल्या सोईने आपल्याला हवं ते पाहू शकतो. दुसरं म्हणजे या माध्यमावर वेबमालिके तून खूप तपशिलात जाऊन कथा रंगवण्याची मुभा आहे. मालिके सारखं वेबमालिका वर्षानुवर्ष चालवावी लागत नाही आणि तरी मालिके पेक्षा यात प्रत्येक व्यक्तिरेखेला अधिक वेळ देणं शक्य आहे. त्यामुळे ओटीटी हे उपयुक्त माध्यम ठरतं आहे, असं ती म्हणते.

करोनाकाळातही काम सुरुच’

करोनाचा ‘पवित्र रिश्ता २.०’च्या चित्रीकरणाला फारसा फटका बसला नाही. रात्रीच्या वेळी चित्रीकरण करताना परवानग्या मिळवण्यात काही अडचणी आल्या, मात्र नियमांच्या अधीन राहूनही त्याचे चित्रीकरण उत्तम झाले, असं ती सांगते. मुखपट्टी, अंतरनियम या गोष्टी आहेतच, मात्र कॅमेऱ्यासमोर गेलं की या गोष्टींचं भान राहत नाही. तुम्हाला तुमचं काम चोख बजावायचं असतं आणि शेवटी त्यावरच लक्ष केंद्रित झालेलं असतं, असं तिने सांगितलं.