‘हेट स्टोरी ३’ नंतर ‘सडक’च्या सिक्वलमध्येही गाजणार संजय-पूजाचं हे गाणं

‘हेट स्टोरी ३’ मध्येही या गाण्याचं रिक्रिऐशन करण्यात आलं होतं.

सडक २

बॉलिवूडमध्ये १९९१ साली सुपरहिट ठरलेला ‘सडक’ या चित्रपटाचा सिक्वल लवकरच येणार आहे. महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक’ या चित्रपटामध्ये संजय दत्त आणि पुजा भट्ट ही जोडी पाहायला मिळाली होती. बॉलिवूडमधल्या हिट चित्रपटात गणल्या जाणाऱ्या या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये पुजा भट्टची बहीण अर्थात आलिया भट्ट दिसणार आहे. या सिक्वलमध्ये ‘सडक’मधील एका गाण्याचं रिक्रिएट करण्यात येणार आहे.

१९९१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सडक’मध्ये संजय दत्त, पुजा भट्ट आणि सदाशिव आमरापूरकर यांची मुख्य भूमिका होती. त्यानंतर या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये ‘तुम्हे अपना बनाने की कसम’ हे गाणं रिक्रिएट करण्यात येणार आहे. ‘सडक’मधील ‘तुम्हे अपना बनाने की कसम’ हे गाणं प्रचंड गाजलं होतं. त्यामुळे या गाण्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर भूरळ घालता यावी यासाठी त्याचं रिक्रिऐशन करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, यापूर्वी २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘हेट स्टोरी ३’ मध्येही या गाण्याचं रिक्रिऐशन करण्यात आलं होतं. ‘सडक २’ हा चित्रपट २५ मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने आलिया पहिल्यांदाच वडीलांसोबत काम करणार आहे. त्यासोबतच ‘सडक २’ मध्ये पूजा भट्टदेखील झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sadak 2 alia bhatt and aditya roy kapur to recreate sanjay pooja song