‘फॅण्टम’मधील थरारक भूमिकेमुळे अभिनेता सैफ अली खान याला नेहमीच्या चॉकलेट बॉय भूमिकांपेक्षा वेगळे काहीतरी साकरण्याची संधी मिळाल्याने तो समाधानी आहे. ‘फॅण्टम’मधील त्याच्या अभिनयामुळे अनेक निर्माते सैफकडे आव्हानात्मक व नेहमीपेक्षा वेगळ्या धाटणीच्या भूमिका घेऊन येत असल्याची माहिती त्याने दिली.
एकसारख्याच आणि चॉकलेट बॉय भूमिका करायचा मला कंटाळा येतो, तसेच त्या भूमिकांना मर्यादा आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांचे आव्हान स्विकारण्यातच एका अभिनेत्याचा कस लागतो, वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सैफने आपले मनोगत व्यक्त केले.
ज्यावेळी ‘फॅण्टम’च्या दिग्दर्शकाने चित्रपटात काम करण्याबाबत विचारणा केली, त्यावेळी आपल्याला चित्रपटाविषयी काहीच कल्पना नसल्याचे सांगत, आपल्या वाट्याला आलेली भूमिका आपण चोखपणे साकारत असल्याचे तो म्हणाला.
सैफने आत्तापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. त्यापैकी, ‘दिल चाहता है’मध्ये त्याने एका विनोदी नायकाची भूमिका साकारली आहे. तर ‘हम तूम’ चित्रपटात तो एक रोमँटिक हिरो म्हणून समोर आला. त्याचप्रमाणे ‘ओमकारा’ व ‘एक हसिना थी’ या चित्रपटात त्याने साकारलेला खलनायक उल्लेखनीय होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saif ali khan happy that producers can come with different roles
First published on: 02-09-2015 at 03:14 IST