अभिनेता सैफ अली खानसाठी २०१७ हे वर्ष खास असंच आहे. नवाबचे ‘शेफ’ आणि ‘बाझार’ हे दोन सिनेमे या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. जॉन फॅव्रेऊ यांच्या ‘शेफ’ या हॉलिवूडपटाचा सैफचा शेफ हा अधिकृत रिमेक आहे. हा सिनेमा आधी १४ जुलैला प्रदर्शित होणार होता पण रणबीर कपूर आणि कतरिना कैफचा ‘जग्गा जासूस’ हा सिनेमाही त्याच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन सिनेमे एकत्र नको म्हणून सैफने माघार घेतली आहे. आता ‘शेफ’ हा सिनेमा ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

अलका कुबल- आठल्येंच्या मुलीची गगन भरारी

व्यापार विश्लेषक तरण आदर्शने शेफच्या प्रदर्शनाची तारीख ट्विट केली. आपल्या ट्विटमध्ये त्याने म्हटले की, ‘टी-सिरीज आणि अबंदनटिया यांची निर्मिती असलेला राजा क्रिश्ना मेनन दिग्दर्शित सैफ अली खानचा ‘शेफ’ ६ ऑक्टोबर २०१७ ला प्रदर्शित होणार आहे.’ तरणने सैफच्या या सिनेमाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित केला. या फोटोमध्ये सैफ धाब्यावर जेवण बनवताना दिसतो आहे. पण त्याने शेफचा ड्रेस किंवा टोपी घातलेली नाही. दानिश कार्तिक, दिनेश प्रभाकर, चंदन रॉय सान्याल, सचिन कांबळे आणि सिमरजीत सिंग नागरा यांच्या ही या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

ही एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे जो आंतरराष्ट्रीय रेस्टोरंटमधील नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे धाडस करतो. पण यादरम्यान त्याच्या आयुष्यात अनेक प्रसंग घडत जातात ते नेमके काय हे सांगणारा सैफचा ‘शैफ’ आहे.

अखेर प्रभासचं सर्वात मोठं गुपित उघड झालं

सैफच्या ‘रंगून’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली नसली तरी  सध्या सैफकडे एकापेक्षा एक सिनेमे आहेत पुढच्या वर्षभरात सैफचे एकूण ५ सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. सैफच्या संपूर्ण कारकिर्दीत असे पहिल्यांदाच होत आहे की त्याचे एवढे सिनेमे एकामागून एक प्रदर्शित होत आहेत. त्यामुळे सैफच्या चाहत्यांसाठी ही एक ट्रीटच असणार आहे.