‘मिस हवाहवाई’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी सध्या बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज होतेय. सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून, दर दिवसाआड चित्रपटाच्या सेटवरील काही गोष्टी नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. ‘सैराट’ या विक्रमी चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या धडकमधून अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर आणि जान्हवी कपूर हे नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत.

शशांक खैतान दिग्दर्शित या चित्रपटाचा एक फोटो निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला. करणने शेअर केलेला हा फोटो पाहता चित्रपटाच्या एकंदर कथानकाविषयी काही तर्क लावण्यास सुरुवात झाली आहे. कारण, फोटोमध्ये जान्हवी आणि इशान अगदी निराश दिसत असून, जान्हवीची नजर शून्यात गेल्याचे कळतेय. जान्हवी आणि इशानव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट अनेकांचेच लक्ष वेधतेय ते म्हणजे त्यात दिसणारी नावं. ‘परि संग मधुक’, असं एका दगडावर लिहिलं असून, त्या ठिकाणी एक बंदूकही दिसतेय. त्यामुळे या दृश्यामुळे चित्रपटातून भावनांचा कोलाहल, मनाची घालमेल आणि दाहक वास्तव अशा गोष्टी पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असल्याचे स्पष्ट होतेय.

https://www.instagram.com/p/BcwRmb4gwMp/

वाचा : ‘जब वी मेट’मधील गीतचा प्रियकर आठवतोय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानच्या खेड्यातील एका प्रेमी युगुलावर आधारित असल्याचे म्हटले जातेय. सध्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण तयार करण्यात ‘धडक’ची टीम यशस्वी झाली आहे. त्यामुळे आता अनेकांनाच ६ जुलै २०१८ या तारखेचीच प्रतिक्षा लागलेली आहे. ‘धडक’ चित्रपटाला संगीत देण्यासाठी मराठमोळी संगीतकार जोडी अजय- अतुल यांच्या नावांना प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे सर्वांगाने ‘सैराट’चा हा हिंदी रिमेक बॉक्स ऑफिसवर गाजण्याची चिन्हं आहेत असेच म्हणावे लागेल.