सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप चर्चेत आहे. अभिनेत्री पायल घोषने अनुरागवर गैरवर्तनाचा आरोप केला. अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केले असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे असे ट्विट पायलने केले होते. त्यानंतर अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या. काहींनी अनुरागला पाठिंबा दिला तर काहींना त्याला सुनावले. आता अभिनेत्री सैयामी खेरची जुनी पोस्ट चर्चेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सैयामीने ‘चोक्ड: पैसा बोलता है’ या चित्रपटामध्ये अनुरागसोबत काम केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती एकदा अनुराग कश्यपच्या घरी गेली होती. तेव्हा तेथील अनुभव तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने, ‘जेव्हा मी पहिल्यांदा एके (अनुराग कश्यप)ला भेटले तेव्हा त्याने मला त्याच्या वर्सोवा येथील घरी बोलवले होते. त्यावर मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला चिंता करु नकोस माझे आई-वडिल माझ्यासोबत राहतात. त्याला बॅड बॉय ऑफ बॉलिवूड असे म्हटले जाते. काही लोकं त्याला तो ड्रग्ज घेतो आणि महिलांसोबत गैरवर्तन करतो म्हणून ओळखतात. जेव्हा मी पाहिलं तेव्हा तो खूप वेगळा असल्याचे मला जाणवले’ असे सैयामीने पोस्टमध्ये म्हटले.

पाहा : रितेश देशमुखसोबत ‘माऊली’ चित्रपटात काम करणाऱ्या सैय्यमीचा बोल्ड अंदाज

पुढे सैयामीने म्हटले, ‘त्याच्या घरात इतर भारतीय घरांप्रमाणेच गडबड आणि गोंधळ सुरु होता.आई-बाबा वर्तमानपत्र वाचत असतात. घराची बेल सतत वाजत होती. चोक्ड ऑफर झाल्यापासून ते रिलीज होईपर्यंत जवळपास तीन वर्षे गेली. दरम्यान मी अनुरागला ओळखू लागले. तो माझ्यासाठी एक मेंटॉर आणि चांगला मित्र झाला होता. त्याच्यासोबत राहिल्यावर मला त्याच्याबद्दल खरे कळाले. जेव्हा त्याला तुमचे काम आवडते तेव्हा तो आनंद व्यक्त करतो.’

आणखी वाचा : अमृता सुभाषने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिला अनुरागला पाठिंबा, म्हणाली…

सैयामीने यापूर्वी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अभिनेता रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या मराठी हिट चित्रपटामध्ये भूमिका साकारली आहे. तसेच तिने ‘चोक्ड: पैसा बोलता है’ या चित्रपटामध्ये अनुरागसोबत काम केले आहे. आता अनुरागवर पायलने गैरवर्तनाचा आरोप केल्यामुळे सैयामीची २२ जून २०२० रोजी केलेली ही जूनी पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saiyami kher throwback post viral for anurag kashyap avb
First published on: 22-09-2020 at 16:05 IST