रूपेरी पडद्यावरील हिट जोड्यांपैकी एक सलमान खान आणि करीना कपूरची जोडी आहे. या जोडीचे ‘क्योंकि’, ‘मैं और मिसेज खन्ना’ आणि ‘बॉडीगार्ड’ चित्रपट गाजले आहेत. यानंतर दोघे ‘दबंग २’च्या एका आयटम साँगवर थिरकताना दिसले. त्यावेळी करीनाचे लग्न झाले होते, हनिमूनवरून आल्यानंतर तिने हे गाणे शूट केले होते. त्यावेळी सलमानने आता करीनासोबत रोमण्टिक दृश्य करणे चांगले वाटणार नसल्याचे म्हटले होते. मात्र आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे ही जोडी सूरज बडजात्याच्या आगामी चित्रपटात एकत्र दिसण्याची शक्यता आहे.  
करिनाचा देसी लूक असल्यामुळ ती या चित्रपटातील अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी योग्य राहिले, असे सलमानचे मत आहे. त्यामुळे त्याने सूरज बडजात्या यांना करिनाचे नाव सुचविले आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सलमानने यासाठी सहा महिन्यांच्या तारखा दिल्या आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने १४ वर्षांनंतर सूरज आणि सलमान एकत्र येणार आहेत. या चित्रपटाद्वारे सलमान पुन्हा ‘प्रेम’च्या रूपात परतणार असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman and kareena together in sooraj barjatyas next
First published on: 15-10-2013 at 04:45 IST