बॉलिवूडचा भाईजान सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत असणारा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केल्याचे समोर आले आहे.

बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, ‘अंतिम’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. जवळपास ४ कोटी ५० लाख रुपयांचा गल्ला चित्रपटाने कमावला आहे. चित्रपटाने चांगली ओपनिंग केल्याचे म्हटले जात आहे. आता विकेंडला चित्रपट किती कमाई करतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
आणखी वाचा : हे तर तू तुझ्या मुलीसोबत रोमान्स केल्यासारखं, तू सैफसोबत…; ‘अतरंगी रे’मुळे अक्षय कुमार ट्रोल

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी देखील अंतिम चित्रपटाचा रिव्ह्यू ट्वीट केला आहे. त्यांनी अंतिम चित्रपटाला ३.५ स्टार दिसे असून चित्रपटातील सलमान, आयुषच्या भूमिकेचे कौतुक केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अंतिम’ हा चित्रपट आज २६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. तर आयुष एका वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट मराठी ‘मुळशीपॅटर्न’ चित्रपटाचा रिमेक आहे.