बॉलिवूडचा दबंग खान सलमानला आज इंडस्ट्रीमध्ये ३१ पूर्ण झाली आहेत. या ३१ वर्षांच्या कालावधीमध्ये सलमानने बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहे. बॉलिवूडच्या सुलतानने १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. परंतु या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातून सलमान खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आला. बॉलिवूडमध्ये ३१ वर्षे पूर्ण झाल्याने सलमानने त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने ‘ माझ्या ३१ वर्षांच्या प्रवासात माझी साथ दिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आणि या फिल्म इंडस्ट्रीचे आभार. माझ्या चाहत्यांचेही आभार त्यांच्यामुळे माझा प्रवास सुखकर झाला’ असे कॅप्शन दिले आहे.

सध्या सलमान त्याचा आगमी चित्रपट ‘दबंग ३’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. ‘दंबग ३’ हा प्रिक्वल असून यात चुलबूल पांडेची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत तर दुसरीकडे हा चित्रपट नोएडामधल्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनातील सत्य घटनांवर आधारित असल्याचेही म्हटले जात आहे. प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा हा चित्रपट २० डिसेंबर २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसह अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत असून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर सलमानच्या कॉलेज जीवनातील प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून सई बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.