बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खानने आजवर चित्रपटात किसिंग सीन टाळले आहेत. हे जगजाहीर आहे. मात्र, सलमानने हा नियम आता केवळ त्याच्यापुरताच मर्यादित ठेवलेला नाही. सलमान खानची निर्मिती असलेल्या ‘हिरो’ या आगामी चित्रपटातील किसिंग सीन त्याच्या सुचनेनंतर हटविण्यात आला आहे. आपला चित्रपट कुटुंबातील प्रत्येकाने पाहण्यासारखा असावा, या विचारातून सलमानने हा सीन हटविण्याची सुचना केल्याचे समजते.
‘सलमान खान फिल्म्स’ या बॅनरखाली सलमानने नुकतीच चित्रपट निर्मिती सुरू केली. ‘बजरंगी भाईजान’नंतर सलमान खानची निर्मिती असलेला ‘हिरो’ हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातून सुरज पांचोली आणि अथिया शेट्टी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. सुरज पांचोली आणि अथिया शेट्टी यांच्यात चित्रपटातील एका गाण्यात किसींग सीन होता. सीन अगदीच बोल्ड वगैरे नव्हता. मात्र, तरीही सलमानने तो सीन हटविण्यास सांगितला. आजवर सलमान आपल्या चित्रपटात बोल्ड सीन देणे टाळून अॅक्शन मसालापटांवर भर देत आला आहे. ‘हिरो’ चित्रपटातील किसिंग सीन हटविण्याच्या सलमानच्या निर्णयामुळे आता आपली निर्मिती असलेल्या चित्रपटात देखील प्रणयदृष्ये टाळून नवा पायंडा घालण्याचा सलमानचा प्रयत्न आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan cuts out kiss scene from hero
First published on: 28-08-2015 at 03:30 IST