सलमानने ‘हीरो’चा रिमेक करण्याची जोखीम पत्करली- सुभाष घई

प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने हिरो चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती करण्याची मोठी जोखीम पत्करली असल्याचे मत १९८३ साली प्रदर्शित झालेल्या हीरो या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.

प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने हिरो चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती करण्याची मोठी जोखीम पत्करली असल्याचे मत १९८३ साली प्रदर्शित झालेल्या हीरो या मूळ चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले. तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एखाद्या चित्रपटाचा रिमेक करण्याचे धाडस दाखविल्याबद्दल सलमानचे कौतुक करायला हवे, असेही ते पुढे म्हणाले. या चित्रपटाच्या यशप्राप्तीसाठी घई यांनी शुभेच्छा देखील दिल्या.
सलमान माझा नेहमी आदर करीत आला आहे. ‘हिरो’ चित्रपट तुमचा असल्यामुळे तुम्हीसुद्धा ‘हिरो’च्या रिमेकचा निर्मिता व्हावे अशी इच्छा सलमानने आपल्याजवळ व्यक्त केली होती. पण, या रिमेकच्या निर्मितीसाठी खरे प्रयत्न पूर्णपणे सलमानने केले आहेत. चित्रपटाच्या संगीतापासून इतर सर्व गोष्टींवर सलमान आणि दिग्दर्शक निखिल अडवाणी यांच्या टीमने मेहनत केली आहे, असे सुभाष घई यांनी यावेळी सांगितले.
हिरो या चित्रपटातून आदित्य पांचोली यांचा मुलगा सूरज पांचोली आणि सुनील शेट्टी यांची मुलगी अथिया शेट्टी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणात आहेत. त्यांचेही सुभाष घई यांनी भरभरून कौतुक केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan has taken risk with hero remake says subhash ghai

ताज्या बातम्या