Shots Fired Outside Salman Khan’s House Mumbai : गुजरात पोलिसांनी १४ एप्रिल रोजी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानाबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन संशयितांना अटक केली. त्यानंतर दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले. भुज पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, अटक करण्यात आलेल्या दोन व्यक्तींची नावे विक्की गुप्ता (२४) आणि सागर पाल (२१) आहेत, दोघेही बिहारच्या चंपारण येथील आहेत आणि कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचं म्हटलं जातंय. भुज पोलिसांनी कारवाई करत काल (१५ एप्रिल) त्यांना अटक केली.

बॉलिवूडचा दंबग खानच्या गॅलक्सी या घराबाहेर रविवारी सकाळी काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. गोळीबार करून त्यांनी तत्काळ तेथून पळ काढला. फ्री प्रेस जर्नलने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार,आरोपींनी मुंबईतून बसमधून पळ काढला. पोलिसांच्या अटकेपासून वाचण्याकरता बिहारमध्ये त्यांच्या गावी जाणे टाळले. त्याऐवजी त्यांनी कच्छमध्ये आश्रय घेतला. गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील ‘माता नो मध’ येथील त्यांच्या नातेवाईकांकडे राहिले.

ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
Raj Thackeray meets Salman khan
Video: राज ठाकरेंनी घेतली सलमान खानची भेट; गोळीबार प्रकरणात हल्लेखोरांचे फोटो आले समोर
dubai flood
Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”

हेही वाचा >> “या भ्याड हल्ल्याचा…”, शत्रुघ्न सिन्हांची सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराबद्दल प्रतिक्रिया; म्हणाले, “मला या…”

पिस्तुल नदीत फेकले, केस कापले, दाढी केली

कच्छच्या प्रवासादरम्यान त्यांनी हल्ल्यात वापरलेले पिस्तूल सुरतजवळील नदीत फेकून दिले. नंतर, त्यांची ओळख लपविण्यासाठी दोन्ही व्यक्तींनी कच्छला पोहोचल्यावर केस कापले आणि दाढी केली. परंतु, तरीही पोलिसांनी त्यांना अटक केली. संशयित विकी गुप्ता आणि सागर पाल यांना कडेकोट बंदोबस्तात मुंबई विमानतळावर आणण्यात आले. गुजरात पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, भुज शहरात करण्यात आलेल्या विशेष पोलिस कारवाईमुळे फरार आरोपींना अटक करण्यात मदत झाली. त्यांच्या अटकेनंतर, दोन्ही आरोपींनी चौकशी सत्रादरम्यान गोळीबारात त्यांचा सहभाग असल्याची कबुली दिली.

२५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना मंगळवारी मुंबईत आणून दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात केलं होतं. गोळीबाराच्या घटनेमागील सूत्रधार ओळखण्यासाठी चौकशी आवश्यक असल्याच्या कारणावरून गुन्हे शाखेने या दोघांच्या कोठडीची मागणी केली. याप्रमाणे, न्यायालयाकडून दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. याशिवाय या हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. सलमानच्या घराबाहेर या दोन आरोपींनी पाच फायर राऊंड केल्याचं त्यांनी सांगितलं.