दबंग खान सलमानचे लग्न हा नेहमीच बॉलीवूडमधील चर्चेचा विषय राहिला आहे.  सल्लूचे बॉलीवूड अभिनेत्रींपासून ते मॉडेलपर्यंत नाव जोडले गेले. मात्र, त्याची सहचारिणी कोण होणार यावरचे प्रश्नचिन्ह अद्यापर्यंत काही हलले नाही. बहुतेक सलमानच्या चाहत्यांना त्याला नेहमीच एकट पाहाव लागणार. कारण, सलमानने एका कार्यक्रमादरम्यान मी बहुतेक कधीचं लग्न करणार नाही असे म्हटले आहे.
दूरदर्शनवरील एका मुलाखतीत तो म्हणाला की, मी माझ्या सामाजिक जीवनात खुश आहे. मी माझं आयुष्य समाजसेवा आणि गरीब मुलांना मदत करण्यात घालवणार आहे. राजकारणात जाण्याचा माझा कोणताही विचार नसून मी त्यापेक्षा माझ्या सामाजिक कार्यावर लक्ष्य देईन. काही ठिकाणांना दत्तक घेऊन तेथील मुलांच्या भवितव्यासाठी काम करण्याचेही त्याने ठरवले आहे. बॉलीवूडच्या या बॅचरला लग्नाबाबत विचारले असता तो म्हणाला, सध्या माझा लग्नाचा कोणताही विचार नाही किंवा मी बहुतेक लग्न करणार नाही. आता काय म्हणाव या दबंग खानला. इथे त्याचे सर्व चाहते त्याच्या लग्नाकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र,  सल्लूने सरळ लग्नाचा विचार नाही असे बोलून चाहत्यांच्या स्वप्नावर पाणी फिरवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan i may end up never marrying
First published on: 28-07-2014 at 11:39 IST