बॉलिवूड अभिनेता सलमान खान salman khan याने शुक्रवारी महापालिकेचे आयुक्त अजय मेहता यांच्यासोबत आरे कॉलनी मद्रासी पाढा भागातील स्वच्छता सुविधांचा आढावा घेतला. या भागाला त्याने दुसऱ्यांदा भेट दिली. यावेळी त्याने सार्वजनिक शौचालयाचे उदघाटन देखील केले. हे शौचालय सलमान खानची स्वयंसेवी संस्था ‘बिइंग ह्युमन’ आणि मुंबई महानगरपालिकेने मिळून बांधले आहे. प्रत्येक ठिकाणी ५०० मीटरच्या अंतरावर शौचालय बांधण्याच्या पालिकेच्या योजनेअंतर्गत या शौचालयाची बांधणी करण्यात आली आहे.

यावेळी सलमान म्हणाला की, या भागात ३००० पेक्षाही जास्त घरं असून प्रत्येक घरात सहा – सात लोक राहतात. पण येथे केवळ ३३ शौचालय असल्याने या शौचालयाची बांधणी करण्यात आली आहे. काही घरांमध्ये आधीच शौचालय असून त्यांची पुनर्बांधणी करण्यात आलीय. तसेच, पाण्याचा पुरवठाही करण्यात आला आहे. या शौचालयाचा लोक उपयोग करतील आणि उघड्यावर बसणार नाहीत. ही आताशी केवळ सुरुवात आहे.

वाचा : केदारनाथाच्या आशिर्वादाने सारा अली खानची नव्या इनिंगला सुरुवात

काही दिवसांपूर्वीच सलमानने पालिकेला पाच मोबाईल टॉयलेट दिले. लोकांनी उघड्यावर शौचालय करण्याऐवजी या शौचालयांचा वापर करावा, असे आवाहनही त्याने केले. तसेच, पालिकेने अजून काही शौचालये बांधावीत अशी विनंती करत त्याने या कामासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.

वाचा : प्रियांका चोप्राने खरंच केलीये का नाकाची सर्जरी?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्वच्छतेचा मुद्दा सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे. अभिनेता अक्षय कुमारचा आगामी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छता अभियानावर आधारित आहे. लोकांनी उघड्यावर शौच न करता शौचालयाचा वापर करावा यासाठी अक्षय सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.