तुम्हाला वाटलं सगळं संपल? आम्हालाही तसचं काहीसं वाटल होत. आम्ही बोलतोय सलमान आणि रोमानियाची मॉडेल लुलिया वेंतुर यांच्या प्रेमसंबंधाबद्दल. अर्पिताच्या लग्नाच्या वेळी या दोघांनी एकमेकांसोबत वेळ व्यथित केल्याचे कळते. इतकेच नाही तर सलमानने आपल्या कुटुंबियांसमोर लुलियाची ओळख त्याची प्रेयसी अशी करून दिली.
अर्पिताच्या लग्नाला उपस्थित असलेल्या टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान आणि लुलिया बहुतेकवेळी एकत्र असतात. जॅकलीन आणि डेसी शाहसोबत सलमानचे प्रेमसंबंध असल्याची गेले काही दिवस चर्चा होती. मात्र, मुळात लुलिया आणि सलमान हे एकमेकांवर प्रेम करतात. लुलिया सध्या वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत आहे. हे हॉटेल गॅलेक्सी अपार्टमेंटच्या जवळचं असून तिची सर्व बिले तोच भरतो. तिने अतुल अग्निहोत्रीच्या ओ तेरी चित्रपटात एक आयटम साँगदेखील केले होते. पण, लुलिया ही आपल्या भावाचा बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी वापर करत आहे असा सलमानची बहिण अलविराचा समज होता. त्यामुळे तिला या दोघांचे नाते मान्य नव्हते. मात्र, आता सर्व काही ठीक असून खान कुटुंबिय अजून एका लग्नाची लवकरचं तयारी सुरु करण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan introduced iulia vantur to family as girlfriend on arpitas wedding
First published on: 21-11-2014 at 05:27 IST