रितेश देशमुख सह-निर्माता असलेल्या ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सलमानच्या या मोठेपणाबद्दल रितेशने त्याचे आभार मानले आहेत. ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात सलमान एका पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. निर्माता म्हणून रितेशचा हा तिसरा मराठी चित्रपट असून, या चित्रपटाद्वारे तो अभिनेता म्हणून मराठी चित्रपटात पदार्पण करीत आहे. सलमाननी साकारलेल्या पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेबाबत टि्वटरवरील संदेशात रितेश म्हणतो, दुरुस्ती: या भूमिकेसाठी सलमानने मला कधीच संपर्क केला नव्हता. परंतु, मोठ्या मनाने त्याने ‘लय भारी’ चित्रपटाचा भाग होण्याची इच्छा दर्शवली. सलमानचा मला सार्थ अभिमान आहे. निशिकांत कामत दिग्दर्शक असलेल्या या चित्रपटाचा रितेश सह-निर्माता असून, ११ जुलै रोजी ‘लय भारी’ चित्रपटगृहात झळकेल.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jul 2014 रोजी प्रकाशित
‘लय भारी’ चित्रपटात काम करणे हा सलमानचा मोठेपणा – रितेश देशमुख
रितेश देशमुख सह-निर्माता असलेल्या 'लय भारी' या मराठी चित्रपटात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

First published on: 02-07-2014 at 06:48 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसलमान खानSalman Khanहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan never approached me for role but graciously offered to be part of lal bhaari riteish