सुशांतचा डान्स पाहून ऋषी कपूर झाले होते उत्साही; थ्रोबॅक व्हिडीओ होतोय व्हायरल…

सलमानच्या गाण्यावर सुशांतने केला होता डान्स

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो केवळ ३४ वर्षांचा होता. सुशांतच्या आत्महत्येसाठी सलमान खानला जबाबदार धरले जात आहे. त्याच्यावर सोशल मीडिद्वारे जोरदार टीका होत आहे. परिणामी सलमान विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी एका चाहत्याने सुशांतचा थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत सलमानच्या गाण्यावर डान्स करताना दिसतोय. तसेच अभिनेता ऋषी कपूर त्याला प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

अवश्य पाहा – “खरंच माफी मागायची गरज नव्हती”; सलमानच्या ‘त्या’ ट्विटवर सोना मोहापात्रा संतापली

अवश्य पाहा – लॉकडाउनमुळे अभिनेत्री अडकली लंडनमध्ये; एक झलक पाहण्यासाठी फॅन्स घराखाली करतात गर्दी

हा व्हिडीओ महाराष्ट्र पोलिसांसाठी आयोजित केलेल्या एका खास कार्यक्रमातील आहे. या कार्यक्रमात रणवीर सिंग, अक्षय कुमार, ऋषी कपूर यांसारख्या अनेक नामांकित बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. दरम्यान या कार्यक्रमात सुशांतने सलमानच्या ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्यावर डान्स केला होता. हा डान्स पाहून ऋषी कपूर प्रचंड उत्साही झाले. त्यांनी जोरजोरात टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. हा डान्स पाहून सलमान खानने देखील त्याची स्तुती केली होती असा दावा काही चाहत्यांनी केला आहे. हा थ्रोबॅक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

यापूर्वी काँग्रेस आमदार झिशान सिद्धिकी आणि ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज’ (FWICE) ही कामगारांची संघटना सलमानच्या मदतीसाठी पुढे सरसावली होती. सलमानच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असं त्यांनी एका पत्रकाद्वारे म्हटलं होतं. परंतु यानंतरही सलमान विरुद्धचा रोष अद्याप कमी झालेला नाही. त्याच्या विरोधात सुरु असलेल्या ऑनलाईन पिटिशनवर आता पर्यंत ३४ लाखांपेक्षा अधिक लोकांनी सह्या केल्या आहेत. तसेच गेल्या काही तासांत त्याचे ५५ हजार सोशल मीडिया फॉलोअर्स कमी झाले आहेत. यावरुनच सलमान विरुद्ध पेटलेला संताप आणखी वाढत असल्याचं दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan rishi kapoor sushant singh rajput o o jaane jaana song mppg