बॉलिवूडचा सुलतान सलमान खानने एक असा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगावर नक्कीच काटा उभा राहील. सलमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन कचरा साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सलाम केला आहे. सलमानने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, या कर्मचाऱ्यांसाठी धन्यवाद तर बोललेच पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिंगिंग रेन फिल्म्स द्वारे प्रस्तुत केलेल्या या व्हिडिओचे नाव ‘वंदे मातरम २०१७’ असे आहे. या व्हिडिओमध्ये स्वच्छता कर्मचारी कशा प्रकारे कचरा साफ करतात ते दाखवण्यात आले आहे. सलमानने हा व्हिडिओ शेअर करुन या स्वच्छता कर्मचाऱ्यांबद्दल त्याच्या मनात असणारी आत्मियता स्पष्ट दिसून येते.

सलमानच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख आणि सलमान खान ही जोडी ट्युबलाइट या सिनेमातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना एकत्र पाहता येणार आहे. शाहरुखने नुकतेच या चित्रपटातील त्याच्या भूमिकेच्या भागाच्या चित्रिकरणासाठी हजेरी लावली होती. शाहरुख आणि सलमानच्या एकत्र येण्याने सिनेमाच्या सेटवर उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत होते. पण, ‘ट्युबलाइट’चे दिग्दर्शक कबीर खान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका पोस्टने अनेकांचेच लक्ष वेधले गेले होते. गेल्या बऱ्याच काळापासून या सिनेमाचे चित्रिकरण सुरु असून किंग खानही आता सिनेमाच्या टीमचा एक भाग झाला आहे. हाच आनंद कबीर खानने त्याच्या पोस्टमधून शेअर केला आहे. ‘मेरे करन-अर्जुन आएंगे…आसमान का सीना चीर के आएंगे’ असे लिहिलेली एक ओळही या नोटवर पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सलमान त्याच्या आगामी ‘ट्युबलाइट’ या सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर किंग खानही त्याच्या ‘रईस’ आणि इम्तियाज अलीच्या आगामी सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘ट्युबलाइट’ या सिनेमाविषयी बोलायचे झाले तर, भारत आणि चीन दरम्यान १९६२ मध्ये झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाचे कथानक आधारलेले आहे. या सिनेमात एका सुरेख प्रेमकहाणीचे चित्रण करण्यात आले आहे. सलमानच्या इतर सिनेमांपेक्षा या सिनेमातील त्याची भूमिका फार वेगळी असणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सलमानचा ‘ट्युबलाइट’ सिनेमा येणाऱ्या काळात अनेक कारणांनी गाजणार असेच दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan salute those workers who clean city dirt
First published on: 17-01-2017 at 22:27 IST