छोट्या पडद्यावरील ‘बिग बॉस’ हा शो वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो आहे. ‘बिग बॉस’चे यंदाचे हे १५ वे पर्व सुरु आहे. हा शो सुरु झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता बिग बॉसच्या १५ पर्वाचा अंतिम सोहळा रंगणार आहे. आता यंदाच्या पर्वाचा विजेता कोण असणार हे कळण्या आधी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही अनेक सेलिब्रिटींचे डान्स परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यात एक परफॉर्मन्स हा बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शहनाज गिलचा असणार आहे. यावेळी शहनाज सिद्धार्थ शुक्लाला ट्रिब्यूट देत तू यहीं है या गाण्यावर म्हणून डान्स परफॉर्म करणार आहे. यावेळी शहनाज स्टेजवर पोहोचल्यानंतर सलमानला पाहाताच ती रडू लागली तर तिला रडताना पाहून सलमानला ही अश्रू अनावर झाले.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत सुरुवातीला सलमान शहनाजचं स्वागत करतो. त्यानंतर सलमानकडे पाहून शहनाज रडू लागते आणि बोलते तुम्हाला पाहून सगळं आठवतंय. तेव्हा सलमान तिला मिठी मारतो आणि तिची सांत्वन करण्याचा प्रयत्न करतो. पण शहनाज रडू लागते आणि तिला पाहून सलमानला अश्रू अनावर होतात.

upsc student surprised father with upsc 2023 result in his office then what happened you will get cry watch viral video
या आनंदाला तोड नाही! UPSC निकालानंतर वडिलांच्या ऑफिसमध्ये पोहोचला लेक अन्…; VIDEO पाहून पाणावतील तुमचेही डोळे
Tigress chilling in a jungle stream on a hot summer
Viral Video : हाय गर्मी! उन्हाचा तडाखा सहन झाला नाही म्हणून वाघीन अशा ठिकाणी जाऊन बसली की तुम्ही…
young Man takes selfie with leopard
Video : “डर के आगे जीत है..” शेतकरी तरुणाने घेतली चक्क चित्ताबरोबर सेल्फी, शेतातील व्हिडीओ होतोय व्हायरल
nature-loving rickshaw driver put Plants in rickshaw
“किती सुंदर दादा!”, निसर्गप्रेमी रिक्षचालकाचा हटके जुगाड पाहून प्रवासी झाले खुश, व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

आणखी वाचा : अक्षयचा पांढऱ्या दाढीतील फोटो शेअर करत ट्विंकल म्हणाली, “आपला माल तर…”

आणखी वाचा : इंटरनेट स्पीडवरून रितेशने जिनिलियाला मारला टोमणा, पाहा मजेशीर व्हिडीओ

दरम्यान, आज म्हणजे २९ आणि ३० जानेवारीला बिग बॉसचा अंतिम सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. बिग बॉसच्या १५ व्या पर्वाचा विजेता कोण ठरणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. सध्या बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाश, शमिता शेट्टी, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट हे स्पर्धक पाहायला मिळत आहे. आता विजेता कोण असणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.