बॉलीवूडच्या आगामी ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील सलमान खान आणि सोनम कपूर या जोडीचे फोटोशूट सध्या चांगलेच गाजत आहे. सलमान आणि सोनमने एका मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले आहे. यामध्ये दोघेजणही पारपंरिक पोशाखात असले तरी दोघांचा ‘हॉट’ अवतार लक्ष वेधून घेणारा आहे. ‘हार्पर्स बझार ब्राईड’ या मॅगझिनच्या मुखपृष्ठावर सलमान आणि सोनमची छबी झळकत असून यामध्ये वधुच्या पोशाखातील सोनम ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. या दोघांचा ‘प्रेम रतन धन पायो’ येत्या १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
@harpersbazaarbrideindia my first and hottest magazine cover with @beingsalmankhan woot wo… http://t.co/phlpRghTYY pic.twitter.com/dERHzeDHMM
— Sonam Kapoor (@sonamakapoor) October 5, 2015
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.