सलमान खान आणि सोनम कपूरच्या ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटातील गाण्याचा डबस्मॅश

‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे.

salman khan, sonam kapoor
सलमान खान आणि सोनम कपूर – 'प्रेम रतन धन पायो'

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आणि सोनम कपूरच्या ‘प्रेम रतन धन पायो’ या आगामी चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला आणि ‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावरील सोनमच्या नृत्याला रसिकांकडून चांगली दाद मिळताना दिसत आहे. सोनमसाठी हा चित्रपट फार मोठा असून, सूरज बडजात्या दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सोनम आतुरतेने वाट पाहात आहे. चित्रपटातील ‘प्रेम रतन धन पायो’ गाण्यावरचा डबस्मॅश व्हिडिओ सोनमने शेअर केले आहेत. या डबस्मॅश व्हिडिओमध्ये सोनमचा मित्रपरिवार, स्टाफ, फॅन्स आणि फॉलोअर्स चित्रपटाच्या शीर्षक गीतातील तिची अप्रतिम अदाकारी साकारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. एका व्हिडिओमध्ये तिची केशरचनाकार आणि मेकअप मॅन दृष्टीस पडतात, तर अन्य एका व्हिडिओमध्ये तिची मैत्रिणी आणि रिचा चढ्ढा नृत्य करताना दिसते.

पाहा डबस्मॅश व्हिडिओ क्लिप्स:

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Salman khan sonam kapoors prem ratan dhan payo is a dubsmash hit

ताज्या बातम्या