अली अब्बास जफर दिग्दर्शित टायगर जिंदा है या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या ट्रेलरमध्ये साहसदृश्ये, हाणामारी, रोमान्स या साऱ्याचीच झलक पाहायला मिळत आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘एक था टायगर’, या चित्रपटाचा सिक्वल असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला सोशल मीडियाच्या माध्यमातून संमिश्र प्रतिक्रियांना सामोरे जावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘टायगर जिंदा है’च्या ट्रेलरमध्ये कतरिना आणि सलमानची केमिस्ट्री पाहण्याची संधीही प्रेक्षकांना मिळत आहे. पण भाईजान सलमानच्या या चित्रपटावरही नेटकऱ्यांनी उपरोधिक टीका करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये सलमानच्या काळवीट शिकार प्रकरणावरही उपरोधिक ट्विट करण्यात आले आहे. “शिकार तो सब करते है लेकीन टायगर से बेहतर शिकार कोई नही करता, असे जेव्हा सलमान म्हणतो तेव्हा हरिण त्याला उत्तर देत म्हणते, होय हे माझ्याहून चांगलं कोण जाणू शकेल?”, असे उपरोधिक ट्विट करत सलमानवर निशाणा साधण्यात आला आहे. काही युजर्सनी तर चित्रपटाच्या कथानकावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्क्रीप्ट फारशी प्रभावी नसली तरीही सलमान खान मुख्य भूमिकेत असणाऱ्या चित्रपटाची कमाई सहज ३०० कोटींचा आकडा पार करते अशा आशयाचा एक फोटो पोस्ट करत एका युजरने अनेकांचे लक्ष वेधले आहे. तर काही युजर्सनी कतरिनाच्या अभिनय कौशल्याविषयीही ट्विट केले आहेत.

पाहा : VIDEO : ‘घुमर’ करत दीपिका म्हणतेय ‘दिसला गं बाई दिसला’

‘टायगर जिंदा है’च्या ट्रेलरमध्ये अभिनयाच्या बाबतीत सलमानच्या तुलनेत कतरिना बरीच मागे पडल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे तिच्या अभिनयावरुनही अनेकांनीच खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर करण्यात येणारे ट्रोल आणि चित्रपटाविषयी केल्या जाणाऱ्या टीका या साऱ्यावर आता सलमान खान काही प्रतिक्रिया देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan starrer bollywood movie tiger zinda hai trailer get trolled on social media
First published on: 09-11-2017 at 12:35 IST