सलमान त्याच्या चाहत्यांसोबत आगामी ‘जय हो’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार आहे. याकरिता त्याने उपनगरातील चंदन या सिंगल स्क्रीन चित्रपटगृहाची निवड केल्याचे समजते. सलमान आणि त्याचा भाऊ-दिग्दर्शक सोहेल खान या दोघांना मिळून ही कल्पना सुचली असून, बॉ़लीवूडमध्ये पहिल्यांदाच चाहत्यांसोबत ट्रेलर लाँच करण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. सहसा चित्रपटाचा पहिला लूक हा मीडियाच्या उपस्थित केला जातो.
‘जय हो’च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ डिसेंबरला ‘जय हो’ चा ट्रेलर चंदन चित्रपटगृहात लाँच केला जाईल. नेहमी मीडियाच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित होतो. पण, सामान्य लोकांनी चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरचा आनंद घ्यावा अशी या सुप्रसिद्ध अभिनेत्यांची इच्छा आहे. यावेळी सलमान त्याच्या चाहत्यांशी चित्रपटाविषयी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘जय हो’ची कथा भ्रष्टाचार आणि अन्यायविरुद्ध लढणा-या सामान्य माणसाची आहे. ‘स्टॅलिन’ या तेलगू चित्रपटाचा रिमेक असलेला हा चित्रपट २४ जानेवारीला प्रदर्शित होईल.