बॉलीवूडचा दबंग खान सलमान याने प्रत्येक गोष्ट करून पाहिलीयं. अभिनयाव्यतिरिक्त त्याने गाणं म्हटलंय, पेन्टिंग केली आणि चित्रपटही काढले आहेत. ‘बिइंग ह्यूमन’ या त्याच्या ब्रॅण्ड अंतर्गत कपडे आणि एक्सेसरीज विकून होणारा नफा तो दान करतो. पण त्याचसोबत आता सलमान खान त्याच्या स्वतःच्या सिनेमागृहात चित्रपट दाखविणार आहे आणि तेही स्वस्त दरात.
सलमान खानचे स्वतःचे सिनेमागृह सुरु करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. हे सिनेमागृह सुरु करण्याची तयारी शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहचली आहे. सलमान खान ‘ बिइंग फिल्मी’ अंतर्गत सिनेमागृहांची चेन सुरु करणार आहे. याची सुरुवात महाराष्टातून होईल. एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, महाराष्ट्रात सहा सिनेमागृह स्थापन करून याची सुरुवात होईल. सलमानची संपूर्ण देशभरात ‘ बिइंग फिल्मी’ अंतर्गत सिनेमागृह काढण्याची योजना आहे. पण याची सुरुवात महाराष्ट्रातील छोट्या छोट्या शहरांमध्ये सिनेमागृह सुरु करून होईल. मिळालेल्या वृत्तानुसार, सलमान सुरु करत असलेल्या सिनेमागृहाचे तिकीट दर हे इतर सिनेमागृहांच्या तिकीट दरांपेक्षा कमी असतील. ‘सुलतान’ चित्रपटाच्या प्रसिद्धीवेळीच सलमानने याबाबतचे संकेत दिले होते. सलमानच्या मते, अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे सिनेमागृह नसल्यामुळे लोकं चांगले चित्रपट पाहण्यापासून वंचित राहतात. जोपर्यंत भारतात दहा ते बारा हजार नवे सिनेमागृह सुरु होत नाहीत तोपर्यंत आपल्याला भारतीय चित्रपटांची क्षमता कळणार नाही. भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या ही गाव आणि लहान शहरांमध्ये असून तेथे सिनेमागृह नसल्यासारखेच चित्र आहे.
तसं बघायला गेलं तर सिनेमागृह असूनही कित्येकजण मोबाईल किंवा इंटरनेटवर चित्रपट बघतात. तरीही ब-याचदा निर्मात्यांमध्ये अधिकाधिक स्क्रिन्स मिळाव्यात म्हणून भांडण होत असते. त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त चित्रपट सिनेमागृहातच जाऊन पाहावे हा संदेश सलमानला लोकांपर्यंत पोहचवायचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan to open cinema hall chain being filmi to increase theaters
First published on: 29-09-2016 at 20:28 IST