सलमान म्हणतोय ‘रेस ३’ चा ट्रेलर तयार नाही, म्हणून पोस्टरवर काम चालवतोय

या चित्रपटात सलमानसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडीस, डेजी शहा आणि साकिब सलीम हे देखील दिसणार आहे.

१५ मे रोजी 'रेस ३' चा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

सलमानच्या बहुचर्चित अशा ‘रेस ३’ चा ट्रेलर कधी एकदा प्रदर्शित होतोय याची उत्सुकता चाहत्यांना लागून आहे. पण गेल्याकाही दिवसांपासून फक्त याचे पोस्टर प्रदर्शित करून चाहत्यांची उत्सुकता ताणली जात आहे. हा ट्रेलर प्रदर्शित व्हायला एवढा उशीर का झालाय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर भाईजान सलमाननं याचं उत्तर स्वत: ट्विट करून दिलंय.

‘एक गोष्ट खरं खरं सांगू.. रेस ३ चा ट्रेलर अजूनही तयार झालेला नाही. त्यामुळे नाईलाजानं आम्ही पोस्टर तयार केले. पण म्हणतात ना सब्र का फल मिठा होता है तसंच काहीसं या ट्रेलरचं आहे. तुमची प्रतीक्षा व्यर्थ जाणार नाही. १५ मे रोजी याचा ट्रेलर आम्ही प्रदर्शित करत आहोत असं ट्विट सलमाननं केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना कमालीची उत्सुकता याबद्दल आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूझा करत असून, रमेश तौरानी आणि सलमान खानने या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उचलली आहे. या चित्रपटात सलमानसोबत अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडीस, डेजी शहा आणि साकिब सलीम हे देखील दिसणार आहे. सलमान यात पहिल्यांदाच ग्रे शेड असणारी भूमिका साकारताना दिसणार आहे अशीही चर्चा आहे. त्यामुळे सलमानच्या या भूमिकेबद्दल त्याच्या चाहत्यांना देखील कुतूहल आहे.

हा चित्रपट याचवर्षी ईदला प्रदर्शित होणार आहे. सध्या लदाखमध्ये या चित्रपटाचं चित्रिकरण सुरू आहे. याआधी दुबई, अबु- धाबीमध्ये या चित्रपटाचं चित्रिकरण पार पडलं. पण या चित्रपटाचं प्रदर्शन कदाचित लांबण्यात येईल अशाही चर्चा आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Salman khan tweet why delaying of race 3 trailer launch

ताज्या बातम्या